SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नेटवर्क प्रॉब्लेम सुटेना, मग मोबाईल नंबर न बदलता ‘अशी बदला कंपनी..

आपल्याकडे सध्या 4G मोबाईल म्हणजेच 4G नेटवर्क देणारे किंवा फिचर फोन असतील कि जे 2G किंवा 3G नेटवर्क ला सपोर्ट करू शकते. सध्याच्या काळात आपण सिम चा वापर करून आपल्या नातेवाईकांची मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधू शकतो. संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता असते. हा मोबाईल नंबर सिम मुळे आपल्याला भेटतो, कारण मोबाईलमधील सिम नुसार हा नंबर बदलतो. पण तुम्हाला माहिती आहे का..?

आपल्या मोबाईल मधील सिम ज्या कंपनीचे जसे की, Reliance Jio, Vi, Airtel आणि BSNL असेल तर अशी कंपनी आपल्याला ती सिम देऊन एक नंबर देते त्याद्वारे आपण इतरांना कॉल लावू शकतो. परंतु नेटवर्कची सेवा अशा सिम च्या कंपनीमार्फतच मिळते. पण काही कंपन्यांचे नेटवर्क आपल्याला कुठे जास्त तर कुठे कमी मिळते यालाच आपण रेंजदेखील म्हणतो.

Advertisement

कंपन्यांच्या नेटवर्कनुसार आपण कंपनी निवडतो. कोणत्या कंपनीचे सिम चांगले आहे किंवा खराब असल्यामुळे आपण ते पोर्ट करण्यासाठी विनंती करतो. ही विनंती मोबाईल शॉपमध्ये गेल्यानंतरही आपण करू शकतो किंवा मेसेज द्वारेही आपण घरबसल्या करू शकतो. घरबसल्या आपण काही प्रोसेस केल्यानंतर उर्वरित प्रोसेस आपल्याला मोबाईल शॉपमध्ये किंवा स्टोअर मध्ये जाऊन करावी लागते. चला तर मग जाणून घेऊ ही सोपी पद्धत..

ग्राहकांना एखाद्या कंपनीची सेवा नेटवर्क चांगले नसल्याने आवडत नाही. त्यामुळे नेटवर्क ज्या कंपनीचे चांगले आहे त्या दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड मोबाईल नंबर न बदलता ग्राहक खरेदी करू शकतात.

Advertisement

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून पोर्ट मग एकदा स्पेस देऊन तुमचा मोबाईल नंबर लिहा आणि हा मेसेज 1900 वर पाठवा. उदाहरणार्थ, जर तुमचा मोबाईल नंबर 9876543210 असेल तर PORT 9876543210 असं लिहून तुम्ही तो 1900 या नंबरवर पाठवा.

मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये एक कोड असेल. या कोडसह, तुम्हाला ज्या कंपनीची सेवा हवी असेल म्हणजेच तुमचा सध्याचा नंबर न बदलता तुम्हाला कोणत्या कंपनीची निवड करायची आहे. अशा कंपनीच्या जवळच्या स्टोअरमध्ये जा किंवा कोणत्याही मोबाईल शॉपमध्ये जा.

Advertisement

दुकानदार तुमच्या मेसेजची पुष्टी करेल आणि ओळखपत्र तपासेल. तुमच्या आवश्यक डिटेल्स घेईल मग तुम्हाला नवीन सिम कार्ड देईल. नवीन सिम दिल्यानंतर, तुमचे नवीन सिम कार्ड केव्हा सक्रिय होईल किंवा 3 ते 5 दिवसांत सक्रिय होईल का, हे दुकान मालक तुम्हाला सांगू शकेल. जर तुम्हाला कोणतीही प्रोसेस करता नाही आली तर दुकानदार सर्व करून देईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement