SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदीचे दर बदलले, दागिने खरेदीसाठी ‘येथे’ चेक करा नवे दर..

आज सोन्याच्या दरात बदल झाला असून सोन्याचे दागिने तुम्हाला किंचित जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागू शकततात. आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ते जरासं महाग झालं आहे आणि चांदीच्या दरात बदल होऊन चांदी स्वस्त झाली आहे. जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) माहीत असायला हवी. सोन्याच्या किंमतीत फारशी वाढ न झाल्याने आणि चांदीची किंमत घसरल्याने आजदेखील तुम्हाला दागिने खरेदीची मोठी संधी आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार..

Advertisement

आज (ता. 22 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज किंचित वाढीव दराने दागिने मिळू शकतात. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 200 रुपयांनी तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 240 रुपयांनी वाढले आहेत.

आजचे दर पाहता 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज 46,000 तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,200 रुपयांना मिळत आहे. याशिवाय चांदी किलोमागे 200 रुपयांनी स्वस्त झाली असून आज जर चांदीचे दागिने तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आज 1 किलो चांदी 57,200 रुपयांना मिळत असून 10 ग्रॅम चांदीसाठी फक्त 572 रुपयांच्या जवळपास पैसे खर्च करावे लागू शकतात.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 46,400 रुपये
▪️ मुंबई – 46,000 रुपये
▪️ दिल्ली – 46,150 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,000 रुपये
▪️ बंगळुरू – 46,050 रुपये
▪️ हैदराबाद – 46,000 रुपये
▪️ पुणे – 46,030 रुपये
▪️ लखनऊ – 46,150 रुपये
▪️ नागपूर – 46,030 रुपये
▪️ नाशिक – 46,030 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,620 रुपये
▪️ मुंबई – 50,200 रुपये
▪️ दिल्ली – 50,350 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,200 रुपये
▪️ बंगळुरू – 50,240 रुपये
▪️ हैदराबाद – 50,200 रुपये
▪️ पुणे – 50,230 रुपये
▪️ लखनऊ – 50,350 रुपये
▪️ नागपूर – 50,230 रुपये
▪️ नाशिक – 50,230 रुपये

Advertisement

(तुमच्या शहरांतील अचूक दर बघण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन चौकशी करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement