SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात होणार मोठे बदल..? शेतकरी चिंतामुक्त होणार..?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ग्रामीण भागात शेत जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात वाद होतात. त्यातून होणाऱ्या गुन्हाचे प्रमाणही फार मोठे आहे. त्यात सरकारच्या काही निर्णयांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अडचण झाली होती.

राज्यातील शेतकऱ्यांना आता ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ नुसार, जिरायती जमीन ही 2 एकरांपेक्षा कमी असल्यास विकता येत नव्हती, तर बागायती जमीन ही 20 गुंठ्यांपेक्षा कमी असली, तरी विकता येत नव्हती. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर समस्या येत होत्या..

Advertisement

खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

विशेष म्हणजे, 2 एकरांच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीनही विकता येत नव्हती. शेतरस्ते व जमिनीच्या बांधावरुनही भांडण-तंटे वाढले होते. राज्य सरकारच्या या नियमामुळे शेतीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारच ठप्प झाले होते. मात्र, प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर शेतकऱ्यांना हे व्यवहार करता येत असत..

Advertisement

ही बाब लक्षात आल्यावर राज्य सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.. तत्पूर्वी या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व हरकतीही मागवल्या होत्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सूचना व हरकती राज्य शासनाकडे पाठवल्या.

राज्य शासनाने जमिनीच्या व्यवहाराच्या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दाखल केला असून, त्यावर ऑक्टोबर महिन्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतजमीन खरेदीसाठीची शासनाने ठरवून दिलेली मर्यादा आता शिथील होण्याची शक्यता आहे.

Advertisement

काय बदल होणार..?

नव्या प्रस्तावानुसार, आता ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’मध्ये बदल केला जाणार आहे. आता शेतकऱ्यांना 2 एकर जिरायती शेतीऐवजी 20 गुंठे, तर बागायती जमिनीसाठी 20 गुंठ्याऐवजी 5 गुंठ्यांची मर्यादा ठरवून दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करणं सोप्पं होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement