SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑक्टोबरमध्ये बॅंकांना ‘इतके’ दिवस सुटी, आताच उरकून घ्या बॅंकेतील कामे..!!

बॅंकेशी संबंधित कामे असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सप्टेंबर महिना संपत आला असून, 2022 या वर्षातला 10 वा महिना म्हणजे ऑक्टोबर लवकरच सुरु होत आहे. खरं तर हा महिना मोठ्या सणासुदीचा असतो. त्यामुळे सुट्यांचे प्रमाणही अधिक असते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी नुकतीच समोर आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक.. अर्थात ‘आरबीआय’ने (RBI) ऑक्टोबर-2022 मधील बॅंकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. त्यानुसार, या महिन्यात बॅंका 10 दिवस बंद राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बँकांशी संबंधित महत्वाची कामे बाकी असतील, तर लवकर उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.. (Bank Holidays List October 2022)

Advertisement

ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी सारखे सर्वात महत्वाचे सण आले आहेत. या सणांच्या काळात बँकांना सुटी राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद असतील, हे जाणून घेऊ या..

ऑक्टाेबरमधील सुट्ट्यांची यादी

Advertisement

▪️ 2 ऑक्टोबर (रविवार) – गांधी जयंती –(रविवार)
▪️ 5 ऑक्टोबर (बुधवार) – दसरा  (बुधवार)
▪️ 8 ऑक्टोबर (दुसरा शनिवार) – बँक सुट्टी

▪️ 9 ऑक्टोबर (रविवार) – ईद-ए-मिलाद
▪️ 16 ऑक्टोबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
▪️ 22 ऑक्टोबर (चौथा शनिवार) – बँक सुट्टी

Advertisement

▪️ 23 ऑक्टोबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी
▪️ 24 ऑक्टोबर (सोमवार) – दिवाळी
▪️ 25 ऑक्टोबर (मंगळवार) – दिवाळी
▪️ 30 ऑक्टोबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

‘आरबीआय’च्या यादीनुसार, वरीलप्रमाणे बॅंकांना सुट्ट्या असल्याने, पुढील ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बँकांचे कामकाज होणार नाही. मात्र, या कालावधीत ग्राहकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement