SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

वृषभ (Taurus): व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

मिथुन (Gemini) : कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आपल्या आणि मित्राच्या घरातील वयोवृद्धांचा मान राखा.

कर्क (Cancer) : सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवावेत. आज तुम्हाला डोकं शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास जरा चांगलं वाटेल.

सिंह (Leo) : वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

कन्या (Virgo) : खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधि मिळेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्याबाबत हलगर्जीपणा करु नका.

तुळ (Libra) : रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आपल्या भावाकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा.

वृश्‍चिक (Scorpio) : धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. आज नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

धनु (Sagittarius) : अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम.

कुंभ (Aquarious) : मुलांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन (Pisces) : प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement