SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलग पराभवानंतर रोहित शर्मा भडकला, ‘या’ खेळाडूंना दिला थेट इशारा..

टी-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आलेली असताना, भारतीय संघासाठी काहीच चांगलं घडताना दिसत नाही. आशिया चषकात पाकिस्तान व श्रीलंकेकडून पराभव झाल्यानंतर स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 208 धावा केल्यानंतरही भारताच्या पदरी निराशाच आली..

सलगच्या पराभवामुळे भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच नाराज झालाय.. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिका पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहितने काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.

Advertisement

बाॅलिंगबाबत नाराजी

विशेषत: भारतीय बाॅलिंगबाबत नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला, की “मला वाटत नाही, की आम्ही चांगली गोलंदाजी केली. 208 धावांचा बचाव करण्याची आम्हाला एक चांगली संधी होती. मात्र, सामन्यात मिळालेल्या अनेक संधींचा आम्ही फायदा घेतला नाही. फलंदाज चांगले खेळले, पण गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.”

Advertisement

रोहित म्हणाला, की “आम्हाला माहितीय की मोहालीच्या मैदानावर धावा अधिक होतात. अशा ठिकाणी तुम्ही 200 पेक्षा अधिक धावा करूनही विजयाची हमी देऊ शकत नाही. आम्ही काही प्रमाणात विकेट घेतल्या, पण ते आमच्यापेक्षा अधिक चांगले खेळले. मी त्यांच्या चेंजिंग रुममध्ये असतो, तर अशा धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची अपेक्षा ठेवली असती.”

“अखेरच्या 4 षटकांत कोणीच चांगली गोलंदाजी न केल्याने संघाचा पराभव झाला. अखेरच्या काही षटकात आम्हाला विकेट घेता आल्या नाहीत. आम्ही अखेरच्या 3 षटकांत आणखी एखादी विकेट घेतली असती, तर परिस्थिती वेगळी असती.”

Advertisement

“तुम्ही रोज रोज 200 धावा नाही करू शकत. त्यामुळे चांगली गोलंदाजी करावीच लागणार आहे. हार्दिकने चांगली फलंदाजी करताना, आम्हाला 208 धावांपर्यंत पोहोचवले होते. पुढील सामन्याच्या आधी आम्हाला गोलंदाजीवर अधिक लक्ष द्यावे लागेल..” असे रोहितने स्पष्ट सांगितले..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement