SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छप्परतोड कमाई..! महिन्यात 33 टक्के रिटर्न, ‘पतंजली’मुळे गुंतवणुकदार मालामाल…

शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच योगगुरु बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली उद्योग समूहा’ने पुढील 5 वर्षांत 4 कंपन्यांचे ‘आयपीओ’ आणण्याची घोषणा केली होती. गुंतवणुकदारांचा त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे..

सध्या शेअर मार्केटमध्ये ‘पतंजली ग्रुप’ची ‘पतंजली फूड्स’ ही एकमेव लिस्टेड कंपनी आहे. पंतजली ग्रूप आणखी 4 कंपन्यांचा ‘आयपीओ’ (IPO) आणण्याची घोषणा होताच, एकमेव ‘पतंजली फूड्स’च्या (Patanjali foods) शेअरचा भाव चांगलाच वधारला.. गेल्या दोन दिवसांपासून ‘पतंजली फूड्स’च्या स्टॉकला सतत अपर सर्किट दिसत असून, बुधवारी (ता. 21) तर त्याने उच्चांक गाठला..!

Advertisement

महिन्यात 33 टक्के परतावा

शेअर मार्केटमध्ये बुधवारीही या शेअरला अपर सर्किट होते. हा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 1471.5 च्या पातळीवर पोहोचला आहे. स्टॉकसाठी वरचा बँड 5 टक्के आहे. स्टॉकचा एक वर्षाचा निच्चांक 706 इतका राहिला आहे. बुधवारच्या वाढीसह कंपनीचे बाजारमूल्य 53 हजार कोटींवर गेले आहे.

Advertisement

गेल्या एका महिन्याचा विचार केला, तरी ‘पतंजली फूड्स’च्या स्टॉकने गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा दिला आहे. पुढील काही दिवसांत या शेअरमध्ये आणखी तेजी दिसेल, असा ब्रोकरेज कंपन्यांचा अंदाज आहे, तर ‘आयआयएफएल’ (IIFL) सिक्युरिटीजच्या मते, हा शेअर लवकरच 1700 च्या पातळीला स्पर्श करण्याची शक्यता आहे.

5 वर्षात 4 ‘आयपीओ’

Advertisement

योगगुरु बाबा रामदेव यांच्या माहितीनुसार, पुढील 5 ते 7 वर्षांत पतंजली समूहाचा व्यवसाय अडीच पटीनं वाढून एक लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. पतंजली समूह लवकरच आपल्या 4 कंपन्यांचा ‘आयपीओ’ आणणार आहे.. त्यात ‘पतंजली मेडिसिन’, ‘पतंजली लाइफस्टाइल’ आणि ‘पतंजली वेलनेस’ आदींचा समावेश आहे. पुढील 5 वर्षांत या कंपन्या लिस्ट होतील.

पतंजली ग्रुप पुढील काही दिवसांत देशातील तरुणांना 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले. पतंजली समूहाच्या भविष्यातील या योजनांमुळेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकदारांचा पतंजलीच्या स्टाॅकला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement