SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता युट्यूब देणार पैसे, करावं लागणार फक्त हे सोपं काम..

स्मार्टफोन्समुळे आपल्याला अनेक नवीन Apps माहीत झाले. काही कामांसाठी आणि काही मनोरंजनासाठी आपण वापरत असतो. कुठे कुठे तर आपण पैसे देऊन चित्रपट पाहत असतो तर काही ऍप्सवर तुम्हाला थोडंसं काम केलं की पैसेही मिळत असतात. होय, कारण मागील काही महिन्यांपूर्वी जेव्हा टिकटॉक भारतात आले होते तेव्हा ते ठराविक काळानंतर टिकटॉक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रोग्रॅम लॉन्च करून यूजर्सना पैसे कमावण्याची संधी देत होते.

जर तुम्हाला घरबसल्या पैसे कमावायचे असतील तर तुम्हाला Youtube मोठी संधी देत आहे. यासाठी फक्त तुम्हाला युट्यूबचे काही नियम पाळावे लागतील. तसेच पैसे कमावण्यासाठी काही अटी युट्यूबने घालून दिलेल्या आहेत, त्याअंतर्गत युट्यूबचे नवीन फिचर जे ‘Youtube Shorts’ नावाने काही महिन्यांपूर्वी लाँच केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला मनोरंजक व्हिडीओ अपलोड करावे लागतील. यावर शॉर्ट्सच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आता यूट्यूब शॉर्ट्सवरही यूजर्सना जाहिराती दिसतील. जाहिरातीच्या माध्यमातून यूट्यूब शॉर्ट्सवरील मॉनेटायझेशनमुळे युट्यूबवर स्वतःच्या चॅनेलवर कंटेन्ट प्रसिद्ध करणाऱ्यांना युट्यूबकडून पैसे कमावता येऊ शकतात. युट्युबने याआधीच ही नवी प्रक्रिया जाहीर केली होती. पण मोजक्याच युट्युबर्सना याचा फायदा मिळत होता. आता युट्यूब पार्टनर प्रोग्राम अंतर्गत शॉर्ट्स व्हिडिओ निर्मात्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार युट्यूब लवकरच त्याच्या शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट युट्यूब शॉर्ट्ससाठी पार्टनर प्रोग्राम सुरू करू शकते.

यूट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी..

Advertisement

▪️ जर तुम्हाला युट्यूब शॉर्ट्समधून कमाई करायची आले तर तुम्हाला यूट्यूब चॅनेल उघडून त्या चॅनलवरून अनेक व्हिडीओ टाकून यूट्यूबर्सना किमान 1000 सब्सक्रायबर पूर्ण करावे लागतील. याशिवाय एका वर्षात 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण असला पाहिजे अशी अट आहे.
▪️ तसेच मागील 3 महिन्यांत 10 मिलीयन किंवा त्यापेक्षा जास्त व्हूज असलेल्या युट्यूबर्सना या मॉनेटायझेशनचा (पैसे कमावण्याचा) फायदा घेण्यासाठी पात्र असणार आहे.
▪️ Youtube Ad शेअरिंग प्रक्रियेअंतर्गत रेवेन्युमधील 45 टक्के क्रिएटर्सना आणि 55 टक्के युट्यूब स्वतः घेणार आहे.
▪️ युट्यूब स्वतःच्या वाटणीतील 10 टक्के रेवेन्यु युट्यूब शॉर्ट्ससाठी वापरल्या जाणाऱ्या म्युझिकच्या क्रिएटर्सना देण्यात येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement