SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल युजर्ससाठी नव्या ‘गाईडलाईन्स’, ‘या’ गोष्टी करु नका, केंद्राचा सल्ला

जग आधुनिक होतंय, तशा अडचणीही वाढत आहेत. हातात स्मार्टफोन आल्यावर जग जवळ आले खरे, पण आता त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. स्मार्टफोनमुळे डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढले असले, तरी सायबर चोऱ्यांचे प्रकारही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे..

सायबर गुन्ह्यांच्या घटना वाढल्या असल्याने इंटरनेट वापरकर्त्यांनी आता अधिक जागरूक असणं गरजेचं आहे. स्मार्टफोन युजर्ससाठी ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’वर भारत सरकारनं एक एडव्हायजरी जारी केली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया’अंतर्गत भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दलाने स्मार्टफोन युजर्ससाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत.

Advertisement

युजर्ससाठी मार्गदर्शक तत्वे

▪️ सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हानीकारक अ‍ॅप्स डाउनलोड होण्याचा धोका कमी करण्यासाठी केवळ गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा अ‍ॅप स्टोअर (App Store) सारख्या अधिकृत अ‍ॅप स्टोअरमधील कोणतेही अ‍ॅप वापरा.

Advertisement

▪️ अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी नेहमी अ‍ॅपचे वर्णन, डाउनलोडची संख्या, वापरकर्त्यांच्या टिप्पण्या व अतिरिक्त माहिती तपासा. अ‍ॅप परवानग्या व्हेरिफाय करा, अ‍ॅपशी संबंधित असलेल्या परवानग्यांनाच अनुमती द्या.

▪️ साइड लोडेड अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी अविश्वसनीय स्त्रोतावर क्लिक करू नका. अ‍ॅन्ड्राॅईड डिव्हाइस विक्रेत्यांकडून उपलब्ध असताना अ‍ॅन्ड्राईड अपडेट व पॅच इन्स्टॉल करा.
▪️ अविश्वसनीय वेबसाइट ब्राउझ करू नका किंवा अविश्वासू लिंक्सवर क्लिक करू नका. संशयास्पद ई-मेल आणि ‘एसएमएस’मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा.

Advertisement

▪️ मूळ फोन नंबरसारखे नसलेल्या संशयास्पद नंबरकडे लक्ष द्या. स्कॅमर अनेकदा त्यांचा खरा फोन नंबर लपवण्यासाठी ई-मेल-टू-टेक्स्ट सेवा वापरून त्यांची ओळख लपवतात.
▪️ संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी माहिती घ्या. अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या एखाद्याला फोन नंबरद्वारे शोधण्याची आणि नंबर वैध आहे की नाही, याची माहिती शोधण्याची अनुमती देतात.

▪️ वेबसाइट डोमेन स्पष्टपणे दाखवणाऱ्या URL वर क्लिक करा. शंका असल्यास वापरकर्ते शोध इंजिन वापरून भेट दिलेली वेबसाइट कायदेशीर आहे की नाही, हे तपासू शकता.

Advertisement

▪️ फोनवर अँटीव्हायरस आणि अँटी स्पायवेअर सॉफ्टवेअर इंस्टॉल आणि अपडेट ठेवा. तुमच्या अँटीव्हायरसमधील सुरक्षित ब्राउझिंग टूल, फिल्टरिंग टूल्स, फायरवॉल आणि फिल्टरिंग सेवा वापरा.

बॅंकेला माहिती द्या..

Advertisement

वैयक्तिक डिटेल्स किंवा अकाउंट लॉगिन डिटेल्ससारखी कोणतीही संवेदनशील माहिती देण्यापूर्वी, वैध एन्क्रिप्शन प्रमाणपत्र तपासण्यासाठी ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमधील हिरवा लॉक तपासा. ग्राहकाने त्याच्या खात्यातील कोणत्याही असामान्य कृतीची माहिती तत्काळ संबंधित तपशिलांसह आपल्या बँकेला द्यावी, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement