SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय, बेराेजगार तरुण, पोलिसांना ‘दिवाळी गिफ्ट’..

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (ता. 21) महत्वाची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील जनतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Decision) घेतले. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकर भरती, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने मोठे गिफ्ट दिलेय.

राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय

Advertisement

‘एमपीएससी’मार्फत भरती..

राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदं आता ‘एमपीएससी’मार्फत भरली जाणार आहेत. तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत क्लार्क भरती ‘एमपीएससी’मार्फत केली जात नव्हती. यासाठी स्वतंत्र भरती घेण्यात येत होती. मात्र आता वर्ग 3 मधील सर्व पदं ‘एमपीएससी’मार्फतच भरली जाणार आहेत. त्यामुळे या भरतीत कुठलाही घोटाळा होणार नाही व योग्य उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळेल, असा दावा केला जात आहे.

Advertisement

पोलिसांच्या सुट्ट्यांत वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकारने राज्यातील पोलिसांना मोठी भेट दिली आहे. पोलिसांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिस शिपाई ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वाढविण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना आता 12 ऐवजी 20 सुट्ट्या मिळणार आहेत.

Advertisement

धारावीबाबत मोठा निर्णय

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत.. तसेच अतिरिक्त सवलती देऊन धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे..

Advertisement

अन्य महत्वाचे निर्णय..

▪️ भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार. (उच्च व तंत्रशिक्षण)
▪️ पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचे कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ (उच्च व तंत्रशिक्षण)

Advertisement

▪️ राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्जहमी याबाबत सार्वजनिक हिताचे रक्षण (वित्त विभाग )
▪️ सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

▪️ नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा (शालेय शिक्षण विभाग)
▪️ वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला गती देणार. सुधारित खर्चास व  राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. (परिवहन विभाग)

Advertisement

▪️ बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश (पणन विभाग)
▪️ औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पदनिर्मिती करणार (विधी व न्याय)
▪️ आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना (मदत व पुनर्वसन)

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement