SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे ताजे दर..

आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) कमी झाल्याने तुम्हाला अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, अमेरिकन शेअर मार्केट, रशिया-युक्रेन संबंध आणि क्रूड ऑईलचे भाव यांमध्ये वारंवार अस्थिरता असल्याने सोने आणि चांदीची किंमत स्थिर दिसत नसली तरी आज तुम्हाला खरेदीची मोठी संधी असणार आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार..

Advertisement

आज (ता. 21 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज फारच कमी किंमतीत मिळणार आहेत. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 150 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 1500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता. भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झाले आहेत.

तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 170 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 49,960 रुपयांना मिळत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदी किलोमागे 600 रुपयांनी घसरली असून आज 1 किलो चांदी 56,600 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 46,200 रुपये
▪️ मुंबई – 45,800 रुपये
▪️ दिल्ली – 45,950 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये
▪️ बंगळुरू – 45,850 रुपये
▪️ हैदराबाद – 45,800 रुपये
▪️ पुणे – 45,830 रुपये
▪️ लखनऊ – 45,950 रुपये
▪️ नागपूर – 45,830 रुपये
▪️ नाशिक – 45,830 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,400 रुपये
▪️ मुंबई – 49,960 रुपये
▪️ दिल्ली – 50,110 रुपये
▪️ कोलकत्ता – 49,960 रुपये
▪️ बंगळुरू – 50,040 रुपये
▪️ हैदराबाद – 49,960 रुपये
▪️ पुणे – 49,990 रुपये
▪️ लखनऊ – 50,120 रुपये
▪️ नागपूर – 49,990 रुपये
▪️ नाशिक – 49,990 रुपये

Advertisement

(तुमच्या शहरांतील दर देखील कमी झाले असतील. फक्त आपण अचूक दर बघण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement