SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 12वा हप्ता, लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव लगेच तपासा..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या Sarkari Yojana चा लाभ घेणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. शेतकरी (Agriculture) त्यांच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी जाहीर केली गेली आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 2-2 हजार रुपये एकूण 3 हप्त्यांत दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना 11 हप्त्याचे पैसे थेट बँक अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहेत आणि आता प्रत्येक जण 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

Advertisement

आता 12 वा हप्ता (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Village Wise Update List) लवकरच देशातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात हस्तांतरित होईल. कोणत्या शेतकर्‍यांना पंतप्रधान शेतकरी 12 वा हप्ता मिळेल, हे समजणार आहे. आपल्याला 12 व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे की नाही, यासाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तपशीलवार पाहू शकता.

गावच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पहा:

Advertisement

▪️ सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
▪️ येथे आपल्याला खाली उजवीकडे ‘शेतकरी कोपरा’ (Farmers Corner) चा पर्याय दिसेल.
▪️ तिथे खाली आपल्याला ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
▪️ त्यानंतर पंतप्रधान किसान व्हिलेज वाईज अपडेट यादीचे (गावानुसार यादी पाहण्याचा पर्याय) नवीन पेज उघडेल.
▪️ आता नवीन उघडलेल्या पेजवर शेतकर्‍यास त्यांचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव हे प्रत्येक पर्यायांतून निवडावं लागेल.
▪️ मग आता आपल्याला गेट रिपोर्टवर क्लिक करा आणि समोर स्क्रीनवर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी मिळेल.
▪️ ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे अशांनी आपलं नाव आपल्या गावापुरत्या मर्यादीत असणाऱ्या या यादीत शोधावं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement