SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घ्यायचीय? ‘या’ 4 पद्धतीने मोफत होईल काम..

पीएफ खातेधारकांसाठी आज महत्वाची माहीती आम्ही आणली आहे. ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या तुमच्या PF Account मध्ये किती पैसे शिल्लक (PF Balance) आहे, हे समजणार आहे. विशेष गोष्ट अशी की, आपल्याला यासाठी बाहेर जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही हे काम घरबसल्या 4 प्रकारच्या पद्धतीने मोफत करू शकणार आहात.

अलीकडील काही दिवसांपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अनेक सेवा कोरोनाच्या आधीच्या काळात आणि काही सेवा नंतरच्या काळात ऑनलाईन केल्या आहेत. म्हणून आता ईपीएफओ च्या बऱ्याच सेवा तुम्हाला घरी बसून मिळतील. सध्या आपल्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत, हे तपासण्यासाठी तुम्हाला आम्ही 4 पद्धती सांगणार आहोत, चला जाणून घेऊ..

Advertisement

जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर झटपट मिस्ड कॉलद्वारे पीएफ शिल्लक तपासायची असेल तर पीएफ खातेधारकाचा मोबाईल क्रमांक ईपीएफओकडे रजिस्टर केलेला असावा. या नंबरवरून जर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे पीएफ शिल्लक पीएफ ग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. मग काही वेळाने तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे माहीती येईल.

पीएफ शिल्लक एसएमएसद्वारे जाणून घेण्यासाठी, ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर एसएमएस करा. यासाठी EPFO ​​UAN LAN (भाषा) टाईप करा. येथे LAN म्हणजे भाषा. तुम्हाला इंग्रजीत माहिती हवी असल्यास, LAN ऐवजी ENG लिहा. हिंदीत माहिती हवी असेल तर LAN ऐवजी HIN लिहा. खात्याची माहिती हिंदीमध्ये मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहा आणि 7738299899 या क्रमांकावर पाठवा. काही वेळाने तुमच्या मोबाईलवर पीएफ बॅलन्सचा मेसेज येईल.

Advertisement

पीएफ शिल्लक ऑनलाइन पाहण्यासाठी, एखाद्याला ईपीएफ पासबुक (EPF Passbook असं Google वर सर्च करा) पोर्टलला भेट द्यावी लागेल. तुम्हाला या पोर्टलवर UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल. यानंतर पासबुक डाउनलोड / पहा वर क्लिक करा. असे केल्यावर तुमच्या समोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक दिसेल.

तुमच्या स्मार्टफोनवर उमंग ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये EPFO ​​वर क्लिक करा. मग Employee Centric Services वर क्लिक करा. आता View Passbook वर क्लिक करा आणि तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर, आपण पीएफ शिल्लक आता पाहू शकाल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement