SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाची धांदल उडेल. योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका. मानसिक चंचलतेला आवर घालावी. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल.

वृषभ (Taurus): बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पित्त विकाराचा त्रास संभवतो. नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशक्य न समजणे आहे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

Advertisement

मिथुन (Gemini) : भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. गायन कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात.

कर्क (Cancer) : व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे लागेल. जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी. नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. घर खर्च वाढू शकतो. वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे. गैरसमज दूर होतील. पगारदार लोक त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात.

Advertisement

सिंह (Leo) : कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. समोरील प्रश्न शांततेने सोडवावे लागतील. घरातील वातावरण तप्त राहील. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शक्यता.

कन्या (Virgo) : तुमची चिडचिड वाढू शकते. आज वेळ चुकवून चालणार नाही. न आवडणार्‍या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुमची मजबूत छाप पाडता येईल. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.

Advertisement

तुळ (Libra) : मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फार घाई उपयोगाची नाही. आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुस-र्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. सामुदायिक बाबींचे भान राखावे. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी आध्या-त्मिक संबंध अनुभवू शकता. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत.

Advertisement

धनु (Sagittarius) : चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका. भडक विचार नोंदवू नका. छंद जोपासण्यात वेळ घालवावा. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल. आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी.

मकर (Capricorn) : प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वातविकाराचा त्रास संभवतो. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. अति काळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. तुम्ही तुमच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला यश मिळेल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : बोलण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तामसी पदार्थ खाल. बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल.

मीन (Pisces) : वैचारिक शांतता जपावी. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. मौजमजा करण्याकडे अधिक कल राहील. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. कदाचित पारिवारिक वाद विकोपास जातील. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.

Advertisement