SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 6 दिवसांत पैसा डबल, ‘टाटा’ समुहाच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांची चांदी..

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बरेच जण शेअर बाजाराबाबत पूर्ण माहिती न घेताच, पैसे गुंतवतात नि फसतात.. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीने शेअर मार्केटचा पूर्ण अभ्यास करून गुंतवणूक केल्यास, तुम्हाला या शेअर मार्केटमधून छप्परतोड कमाई करण्याचीही संधी मिळते.

भारतीय उद्योगविश्वातील एक मोठं नाव म्हणजे, ‘टाटा समूह’.. शेअर मार्केटमध्येही (Share Market) या उद्योगसमूहाची चांगलीच दादागिरी आहे.. ‘टाटा समूहा’च्या (Tata) अनेक शेअर्समधून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. ‘टाटा’चे काही शेअर्स तर ‘मल्टीबॅगर’ ठरले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, ‘टीआरएफ लिमिटेड स्मॉलकॅप स्पेस’…!!

Advertisement

6 दिवसांत पैसा डबल

‘टीआरएफ लिमिटेड’ (TRF Ltd) कंपनीची स्थापना 20 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. ही कंपनी बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंन्टसाठी विविध इलेक्ट्रो मेकॅनिकल कार्य करते. पायाभूत संरचना व फॅब्रिकेशन, जीवन सायकल सेवा व संबंधित सेवा देण्याचे काम ही कंपनी करते..

Advertisement

टाटा समूहाच्या या शेअरने अवघ्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मंगळवारी (ता. 20) या ‘टीआरएफ’ शेअरने सलग सहाव्या व्यापार सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. तसेच शेअरमध्ये सलग सहाव्या दिवशीही अप्पर सर्किट (Upper Circuit) सुरू झाले. ‘एनएसई’वर (NSE) 340.55 रुपयांच्या या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागले होते.

गुंतवणुकदारांना 101 टक्के परतावा

Advertisement

‘टीआरएफ’ लिमिटेडचा शेअरची किंमत 12 सप्टेंबर 2022 च्या ट्रेडिंग सत्रात 168.8 रुपयांवर बंद झाली होती. मंगळवारी (ता. 20) या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर तब्बल 340.55 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना फक्त सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमधून 101 टक्के परतावा मिळाला.

समजा, ‘टीआरएफ’ लिमिटेडच्या शेअरमध्ये 6 दिवसांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याची किंमत 2 लाखांहूनही जास्त झालेली असेल. म्हणजेच, सहा दिवसांत पैसा डबल..!! सध्या या शेअरचे बाजारमूल्य 373.73 कोटी रुपये आहे.

Advertisement

‘टाटा समूहा’चा या स्टॉकमध्ये आतापर्यंत सुमारे 149 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या शेअरची किंमत होती, 136.80 रुपये.. आता त्याची किंमत 340.55 रुपयांपर्यंत वाढलीय. गेल्या वर्षभरातही गुंतवणूकदारांसाठी हा शेअर ‘मल्टीबॅगर’ ठरला होता. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 185 टक्के परतावा दिला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement