SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टी-20 वर्ल्डकप’ आधी नियमांत मोठे बदल, क्रिकेट अधिक रोमांचक होणार…

क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आलेली असताना, सगळे संघ तयारीला लागले आहेत. टी-20 वर्ल्डकपच्या ‘सुपर 12’ फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. ‘सुपर 12’ फेरीतून 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत.

दरम्यान, इतक्या मोठ्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले आहेत. नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत. ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर हे नियम बदलण्यात आले. नव्या नियमाबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

‘आयसीसी’चे नवे नियम…

नवा फलंदाज स्ट्राईकवर – ‘आयसीसी’च्या नवीन नियमांनुसार एखादा बॅट्समन झेलबाद झाल्यावर नवीन फलंदाजच स्ट्राईकवर राहिल. याआधी एखादा फलंदाज झेलबाद झाला, तर नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज ओलांडली असेल, तर त्याला फलंदाजीची संधी मिळायची. मात्र, आता क्रीज ओलांडली, तरी नवीन बॅट्समनच स्ट्राईकवर असेल.

Advertisement

चेंडू पॉलिश करण्यावर बंदी – कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर थुंकी लावण्यास ‘आयसीसी’ने बंदी घातली आहे. आता हा नियम कायमस्वरुपी असेल. यापुढे कोणत्याही गोलंदाजास चेंडूला थुंकी लावता येणार नाही. बॉल पॉलिश न करण्याचा नियम 2020 मध्ये लागू करण्यात आला होता.

नवीन बॅट्समनला कमी वेळ – कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी नवीन बॅट्समनला तयार व्हावं लागेल. टी-20 फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त 90 सेकंद असेल. याआधी कसोटी व वन-डे सामन्यांमध्ये ही वेळ 3 मिनिटांची होती. मात्र, आता ती कमी करण्यात आलीय.

Advertisement

क्षेत्ररक्षकाला चूक महागात पडणार – मैदानात क्षेत्ररक्षण करताना खेळाडूने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीन मूव्हमेंट केल्यास, दंड म्हणून विरोधी संघाला व फलंदाजाला पाच अतिरिक्त धावा दिल्या जातील. याआधी असे काही झाल्यास ‘डेड बॉल’ किंवा फलंदाजाचा फटका रद्द केला जात होता.

पिच सोडायची नाही – बॉल खेळपट्टीपासून दूर पडला, तरी फलंदाजाला खेळपट्टी सोडून बाॅल मारता येणार नाही. फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर बाॅल मारण्यास गेल्यास, तर अंपायर त्यास ‘डेड बॉल’ घोषीत करतील. तसेच, बाॅलरने फलंदाजाला खेळपट्टी सोडून शॉट खेळण्यासाठी भाग पाडल्यास, तो ‘नो बॉल’ दिला जाईल.

Advertisement

स्लो ओव्हर रेट – जानेवारी- 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये ‘स्लो ओव्हर रेट’चा नियम लागू केला होता. ‘स्लो ओव्हर रेट’साठी संघांना दंड आकारला जात होता. आता हा नियम वन-डेमध्येही लागू होणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement