SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हिरो स्प्लेंडर प्लस बाईक आता नवीन रंगात लाँच, येतेय फक्त ‘एवढ्या’ किंमतीत..

देशातील प्रसिद्ध कंपनीने आता आपली सामान्यांच्या खिशाला परवडणारी बाईक हिरो स्प्लेंडर प्लस आता नव्या रूपात आणली आहे. कंपनीने आपली हि दुचाकी आता नेहमीप्रमाणे न ठेवता तिच्या रंगामध्ये बदल केल्याचं दिसत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल कि मायलेज जबरदस्त देणारी बाईक तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आज आमही चांगला पर्याय सुचवत आहोत. तुम्हाला Hero MotoCorp ने आणलेली ही बाईक खरेदी करण्यापूर्वी काही माहीती देणार आहोत.

देशात दुचाकींचे उत्पादन करणारी कंपनी Hero MotoCorp ने आपली गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये पुष्कळ विक्री होणारी स्प्लेंडर प्लस बाईक यंदा नवीन रंगात लॉंच केली आहे. कंपनीने ही बाईक सिल्व्हर नेक्सस ब्लू रंगात आणली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत बेस व्हेरियंटसाठी 70,658 रुपये ठेवली आहे आणि टॉप व्हेरियंटसाठी 72,978 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Advertisement

नवीन रंगासह आता ही बाईक जवळपास 6 रंगांमध्ये लॉंच केली आहे. Hero Splendor Plus च्या रंग पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, ब्लॅक विथ पर्पल, सिल्व्हर नेक्सस ब्लू, मॅट शील्ड गोल्ड आणि स्पोर्ट्स रेड विथ ब्लॅक मध्ये येणार आहे.

इंजिनबद्दल बोलायच झालं तर कंपनीने यात Hero Splendor Plus मध्ये 97.2 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह 4-स्पीड गिअरबॉक्स मिळणार आहे. बाईकच्या समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशन येईल. हिरोच्या या बाईकला ड्रम ब्रेक मिळणार आहे. हॅलोजन हेडलाइट, टेल लाईट आणि इंडिकेटर मिळेल.

Advertisement

दरम्यान Hero MotoCorp आपला इलेक्ट्रिक वाहन ब्रँड ‘Vida’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. या ब्रँडच्या माध्यमातून कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 7 ऑक्टोबर रोजी सादर करणार आहे. हिरो चित्तूर येथील ग्रीन फॅसिलिटीमध्ये त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Hero MotoCorp चे अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या संकल्पना मॉडेल लॉंच केले होते. अलॉय व्हील्ससह ही स्कूटर खूप स्लिम डिझाइन आणि काळ्या व पांढर्‍या रंगासोबत येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement