SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना येणार ‘अच्छे दिन’… पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा…!!

सध्या जगासमोर अनेक प्रश्न असले, तरी सर्वात मोठी समस्या आहे अन्न संकटाची… या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच उपाय सुचवला आहे. जगभरात बाजरीच्या लागवडीला व वापराला चालना देणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. त्यासाठी मोदींनी ‘मिलेट्स फूड्स फेस्टिव्हल’चं आयोजन करण्याचा प्रस्तावही मांडला आहे.

उझबेकिस्तानमधील ‘शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची नुकतीच बैठक झाली. या शिखर परिषदेत सहभागी होताना, भारताचे पंतप्रधान मोदी यांनी जगासमोरील अन्न संकटावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवल्या. त्यांच्या मते, नागरिकांची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बाजरीच्या लागवडीला, वापराला प्रोत्साहन देणे गरजेचं आहे..

Advertisement

बाजरी वर्ष साजरे करणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, की “बाजरी हे एक ‘सुपरफूड’ असून, हजारो वर्षांपासून जगभर पिकवले जाते. अन्न संकटाचा सामना करण्यासाठी बाजरी हा एक पारंपरिक, पौष्टिक व कमी किमतीचा चांगला पर्याय आहे. पुढील 2023 हे वर्ष UN आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे केले जाईल. अशा वेळी ‘मिलेट्स फूड्स फेस्टिव्हल’चं आयोजन करणं गरजेचं आहे.”

Advertisement

भारतात दरवर्षी 170 लाख टनापेक्षा जास्त बाजरीचे उत्पादन होते. जगभरातील 131 देशांमध्ये बाजरीची लागवड केली जाते. आशिया व आफ्रिकेतील सुमारे 600 दशलक्ष लोक हे बाजरी त्यांचे पारंपरिक अन्न मानतात. आशियातील सुमारे 80 टक्के बाजरी भारतात घेतल जात असल्याचे समजते..

बाजरी उत्पादकांना अच्छे दिन

Advertisement

मधुमेह नियंत्रित करण्यास, तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्याचे काम बाजरी करते. कॅल्शियम, जस्त व लोहाची कमतरता दूर करते. विशेष म्हणजे, बाजरी ग्लूटेन-मुक्त आहे. हृदयविकारांवरही फायदेशीर आहे. शिवाय बाजरी ही ऊर्जेचा चांगला स्रोत असल्याचे मानले जाते. त्यामुळेच बाजरीला ‘सुपरफूड’ म्हटले जाते..

भारताच्या ग्रामीण भागात सर्रास बाजरीची भाकरी खाल्ली जाते. आता शहरी भागात बाजरीला मागणी वाढली आहे. अनेक हॉटेलमध्ये बाजरीची भाकरी नि पिठलं हे प्रसिद्ध मेन्यू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे बोलले जात आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement