SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरदारांसाठी ‘ईपीएफओ’चा मोठा निर्णय..!! ‘पीएफ’सह कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ सुविधा..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.. अर्थात ‘ईपीएफओ’.. देशातील नोकरदार वर्गाला ‘पीएफ’ सुविधा पुरवणारी संस्था..! कर्मचार्‍यांच्या पगाराचा एक छोटासा भाग दरमहा ‘पीएफ’ (PF) खात्यात जमा केला जातो. नोकरी सोडल्यानंतर अथवा सेवानिवृत्तीनंतर एकरकमी सगळे पैसे संबंधित कर्मचाऱ्याला मिळतात..

आरोग्य सेवा पुरवणार…

Advertisement

प्रत्येक क्षेत्रातील कामगार वर्गाच्या सामाजिक सुरक्षेसाठी ‘ईपीएफओ’ संस्था काम करीत असते. ही संस्था आता आपल्या सदस्यांना ‘पीएफ’सह आणखी एक नवी सेवा देण्याच्या तयारीत आहे.. ‘ईपीएफओ’ सदस्यांना लवकरच आरोग्य सेवा, मातृत्व, अपंगत्व लाभासह अन्य सुविधा मिळणार असून, त्यासाठी ही संस्था वेगाने काम करीत आहे.

कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळावेत, यासाठी ‘ईपीएफओ’कडून (EPFO) काही दिवसांपूर्वीच वेतनमर्यादा, तसेच कर्मचारी संख्येच्या मर्यादेचा नियमही शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्याची मूलभूत सामाजिक सुरक्षा पात्रता पूर्ण करण्याचे दीर्घकालीन कौशल्य संस्थेकडे आहे.

Advertisement

‘व्हिजन-2047’साठीचा आराखडा

पेन्शनपासून आरोग्यसेवा, मातृत्व आणि अपंगत्व लाभांपर्यंतच्या सेवांचा विस्तार करण्यावर ‘ईपीएफओ’ सध्या काम करीत आहे. ‘ईपीएफओ’ने ‘व्हिजन-2047’साठीचा आराखडा आखला आहे. ‘ईपीएफओ’च्या देशातील 450 दशलक्ष सदस्यांना या सेवांचा लाभ दिला जाणार आहे.. या सेवा पुरविताना ‘ईपीएफओ’कडून असंघटित क्षेत्रातील 90 टक्के कामगारांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं आहे. त्यासाठी शासन, कामगार कायदा व संस्थेच्या विश्वस्तांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

सामाजिक संरक्षण मजला (SPF) हा मूलभूत सामाजिक सुरक्षा हमींचा राष्ट्रीय स्तरावर परिभाषित संच आहे, ज्याचा उद्देश गरिबी व सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी किंवा कमी करणे आणि आवश्यक आरोग्य सेवा आणि उत्पन्न सुरक्षेचा प्रवेश समाविष्ट आहे. ‘ईपीएफओ’च्या सेवेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यावर असून, त्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement