SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ऑस्कर’साठी ‘या’ भारतीय चित्रपटाची निवड, ‘आरआरआर’, ‘दी काश्मिर फाईल्स’ पडले मागे..

भारतीय चित्रपट रसिकांसाठी महत्वाची बातमी आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार सोहळा मानला जाणाऱ्या ‘ऑस्कर’साठी भारताकडून यंदा गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ‘छेल्लो-शो’ (द लास्ट शो) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा एक गुजराती चित्रपट असून, ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर सिनेमा’ या विभागासाठी भारताकडून निवड झाली आहे..

‘ऑस्कर’च्या शर्यतीत अनेक भारतीय चित्रपट होते. गेल्या काही महिन्यांपासून ‘ऑस्कर’साठी प्रसिद्ध दिग्दर्शक एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’, तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची नावं आघाडीवर होती. मात्र, या अशा अनेक चित्रपटांना मागे टाकून ‘छेल्लो शो’ चित्रपटाची निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहं.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Advertisement

‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीनं ‘ऑस्कर’साठी ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची अधिकृतरित्या निवड झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे यंदाच्या ‘ऑस्कर’मध्ये ‘छेल्लो शो’ हा 110 मिनिटांचा चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केलं आहे.

या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल व परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2021 मध्ये ‘ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या सिनेमाचा प्रीमियर झाला होता. तसेच, ऑक्टोबर-2021 मध्ये 66व्या ‘वैलाडोलिड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या सिनेमाला ‘गोल्डन स्पाईक’ पुरस्कार मिळाला होता.

Advertisement

‘छेल्लो शो’बाबत…

‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटामध्ये गावातल्या एका मुलाची गोष्ट आहे. ज्याचं चित्रपटांवर प्रेम आहे. हा मुलगा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा प्रोजेक्टर टेक्निशियनच्या मदतीने गुजरातमधील ‘छलाला’ इथल्या प्रोजेक्शन रुममध्ये पोहोचतो. अनेक चित्रपट पाहतो. ते पाहताना त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. ‘सिंगल स्क्रिन’ चित्रपटाचं जग ‘छेल्लो शो’मध्ये दाखवलं आहे..

Advertisement

‘छेल्लो शो’चे दिग्दर्शक पान नलिन यांचे आयुष्यही या चित्रपटाशी मिळतं-जुळतं असल्याचं बोललं जातं. ते स्वत: एका छोट्या गावातील आहेत. तिथून त्यांचं चित्रपटप्रेम आता ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळं चित्रपटाची कथा पान नलिन यांची ‘सेमी ऑटोबायोग्राफी’ असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement

 

Advertisement