SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मानसिक ताण घेऊ नका. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा. ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रिय व्यक्तीकडून चुक झाल्यास ती समजून घ्या.

वृषभ (Taurus): कामाचा आवाका वाढेल. जोडीदाराची मोलाची साथ मिळेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल. आळसपणा सोडून राहिलेली कामे पूर्ण करा. नोकरच्या ठिकाणी कामात चुका करणे टाळा. प्रिय व्यक्तीसह प्रेमाने वागा. घरातील ताणतणावापासून दूर रहा.

Advertisement

मिथुन (Gemini) : नियोजित कामे बरगळू शकतात. नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खुश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज नव्या संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : धर-सोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. दुसऱ्यांची मने जिंकल्याचा अनुभव येईल. कामाचे तुमच्या कौतुक केले जाईल. मित्रमंडळींची गाठभेट होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.

Advertisement

सिंह (Leo) : हातचे राखून बोलाल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. मन काहीसे विचलीत राहील. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. चिडचिड होण्यापासून दूर रहा. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहिल. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा.

कन्या (Virgo) : कौटुंबिक सलोखा राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आज कोणतेही नवीन काम करण्यास सुरुवात करु नका. ऑफिस कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

Advertisement

तुळ (Libra) : प्रिय व्यक्तीसोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : कौटुंबिक नातेसंबंध जपाल. योजनाबद्ध कामे सफल होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल. आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात चुका होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवल्यास ताणतणावापासून दूर राहिल्यासारखे वाटेल. घरातील मंडळींचे सहकार्य मोलाचे ठरेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. अति भावनाशील होऊ नका. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा. काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आजूबाजूच्या व्यक्तींना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.

मकर (Capricorn) : परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. पैसे खर्च कराल पण नंतर त्यावर जास्त विचार करु नका. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

कुंभ (Aquarious) : आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लक्ष करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

मीन (Pisces) : नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. दिवस उत्साहात जाईल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मंडळींचा आदर करा. प्रिय व्यक्तीस वेळ द्या.

Advertisement