SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता घरातच ठेवा सोन्याचे दागिने..! चोरीचे वा गहाळ होण्याचे ‘नो टेन्शन’..

सोन्याच्या दागिन्यांची बऱ्याच जणांना हौस असते. मात्र, त्याच वेळी हे मौल्यवान दागिने चोरीला जाण्याचीही भीती सतावत असते. आपली ही अनमोल संपत्ती बरेच जण बँक लॉकरमध्ये ठेवतात. पण, प्रत्येकालाच बँक लॉकरमध्ये दागिने ठेवणं शक्य होत नाही. शिवाय, सणासुदीला दागिने हवे असल्यास वारंवार बॅंकेत हेलपाटे मारावे लागतात.

बॅंकेच्या लाॅकरऐवजी तुम्हाला घरातही सोन्याचे दागिने ठेवता येतात. शिवाय, ते चोरी झाले, गहाळ झाले, तरी तुमचं नुकसान टळू शकतं.. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

दागिन्यांची पाॅलिसी…

घरात सोन्याचे दागिने ठेवायचे असल्यास, तुम्हाला त्यांची विमा पॉलिसी (Gold jewelery insurance policy) काढावी लागेल. जेणेकरून घरातून दागिने चोरीला गेले,  गायब झाले, तरी आर्थिक नुकसान होत नाही. दागिन्यांच्या संरक्षणासाठी विमा कंपन्या दोन प्रकारच्या पॉलिसी देतात. एक म्हणजे ‘स्टँड अलोन ज्वेलरी पॉलिसी’, तर दुसऱ्या पाॅलिसीचे नाव आहे, ‘होम इन्शुरन्स पॉलिसी’..!

Advertisement

‘होम इन्शुरन्स’ अर्थात गृह विमा पॉलिसीला काही मर्यादा येतात. या पॉलिसीअंतर्गत विमा संरक्षण घेतल्यानंतर दागिने चोरीला गेल्यास, दागिन्यांची पूर्ण किंमत परत मिळत नाही. त्यामुळे दागिन्यांच्या संपूर्ण संरक्षणासाठी स्वतंत्र दागिन्यांची (स्टँड अलोन) विमा पॉलिसी घेणं फायदेशीर ठरतं.. ही पॉलिसी तुमच्या दागिन्यांना संपूर्ण विमा संरक्षण पुरविते.

स्वतंत्र दागिन्यांची पॉलिसी घेण्यापूर्वी जवळच्या अधिकृत सराफाकडून तुमच्या दागिन्यांचे बाजार मूल्यांकन करुन घ्यावे. कारण, नंतर विमा क्लेम करताना, कंपन्या तुमच्या दागिन्यांचे मूल्यांकन कमी करू शकतात. त्यात तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते..

Advertisement

हप्ता किती असेल..?

दागिन्यांची विमा पाॅलिसी घेतल्यास 1 लाखांच्या विमा रकमेवर 1000 रुपये प्रीमियम भरावा लागतो. तुम्ही 10 लाखांच्या दागिन्यांचा विमा घेतल्यास, दरवर्षी 10 हजार रुपये ‘प्रीमियम’ भरावा लागेल. एकाच वेळी इतर वस्तूंचीही पाॅलिसी घेतल्यास, विमा कंपन्या प्रीमियममध्ये सूटही देतात..

Advertisement

दागिन्यांसाठी पॉलिसी घेण्यापूर्वी, सर्वात महत्वाचे म्हणजे नियम व अटी जाणून घ्या. दागिने गहाळ झाल्यास क्लेमची प्रक्रिया कशी असेल, याची सगळी माहिती घ्या. दागिन्यांच्या पॉलिसीमध्ये आग व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई दिली जाते. त्यामुळे विमा कंपन्यांचे नियम समजून घेतल्यावरच पॉलिसी घेण्याचा विचार करा.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement