SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’मध्ये नोकरीची संधी, कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ करता येणार…!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप ई-काॅमर्स कंपनी असलेल्या ‘फ्लिपकार्ट’मध्ये लवकरच ‘मेगा भरती’ केली जाणार आहे.. फ्रेशर्ससह प्रोफेशनल उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. या ई-रिटेलर कंपनीने नुकतीच रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना (Recruitment in Flipkart) जारी केली आहे.

विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांना ‘वर्क फ्राॅम होम’ करण्याची परवानगी दिली जाईल. त्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ने अनुभवी, तसेच फ्रेशर्स उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ‘फ्लिपकार्ट’कडून या पदभरतीसाठी देशव्यापी मोहीम राबवली जाणार आहे. कंपनीच्या लिंक्डइन पेजवर, तसेच फ्लिपकार्ट करिअर साइटवरून भरतीची सविस्तर माहिती मिळू शकेल..

Advertisement

व्हर्च्युअल पद्धतीने मुलाखती..

फ्लिपकार्टकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की दिल्ली, कर्नाटक, बिहारसह देशभरात ‘वर्क फ्राॅम होम’ पद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारांसाठी भरती करीत आहोत. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल. या भरतीसाठीच्या मुलाखती व्हर्च्युअल पद्धतीने, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील.

Advertisement

फ्लिपकार्ट कंपनीच्या धोरणानुसार, चांगल्या प्रतिनिधींना अधिक चांगली संधी दिली जाईल, जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील. कर्मचार्‍यांना अशा प्रकारे काम करावे लागेल, की कंपनी स्पर्धात्मक व बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू शकेल. त्यामुळे फ्रेशर्ससह प्रोफेशनल्स उमेदवारांना ‘फ्लिपकार्ट’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी असणार आहे.

आपल्या निवदेनात फ्लिपकार्टने पुढे असं म्हटलंय, की कंपनी नेहमीच योग्य लोकांच्या शोधात असते. पात्र लोकांची दखल घेतली जाते. ग्राहक हे त्यांचे पहिले प्राधान्य असून, त्यांची ‘उत्पादने व सेवा’ या तत्त्वावर आधारित असतील. कर्मचाऱ्यांच्या कला-गुणांना कामाच्या ठिकाणी आणखी वाढवता येते. मजबूत नेतृत्वगुण असणारे लोक संस्थेत प्रगती करू शकतात.

Advertisement

कोरोना महामारीनंतर खासगी कंपन्याच नव्हे, तर सरकारी कर्मचारीही तात्पुरत्या स्वरुपात का असेना ‘वर्क फ्रॉम होम’ करु लागली आहेत. ही बाब लक्षात घेऊन ‘फ्लिपकार्ट’ कंपनीही नवीन कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देणार असल्याचे निवदेनात स्पष्ट करण्यात आलं आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement