SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, ‘या’ बॅंकेची खास योजना..!!

शेतकरी, शेतमजुरांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेती व्यवसायासाठी अनेक बॅंका कृषी कर्ज देत असतात. मात्र, शेतकऱ्यांना अनेक घरगुती गरजाही असतात. या गरजा भागवण्यासाठी कोणतीही बॅंक कर्ज देत नाही. शेतकरी कुटुंबाची ही गरज ओळखून पंजाब नॅशनल बॅंकेने खास कर्ज योजना सादर केली आहे..

पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात दिला जात आहे. शेतकऱ्यांना हे पैसे शेतीशिवाय वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येणार आहेत. ‘पीएनबी’ बॅंकेने ट्विट करुन या कर्ज योजनेबाबत माहिती दिली आहे. ‘पीएनबी’च्या या कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

‘पीएनबी’ची कर्ज योजना

पंजाब नॅशनल बॅंकेने (Punjab National Bank) आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करुन या कर्जयोजनेबाबत माहिती दिली आहे. त्यात असं म्हटलंय, की “प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘पीएनबी’ने ‘किसान तत्काळ कर्ज योजना’ आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी बॅंकेकडून कर्ज घेऊ शकता. ‘किसान तत्काळ कर्ज योजना’ मदतीसाठी तयार आहे.”

Advertisement

याबाबत पंजाब नॅशनल बँकेने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत (Kisan tatkal scheme) त्यांच्या विद्यमान कर्ज मर्यादेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाईल. कर्जाची कमाल मर्यादा 50,000 रुपये आहे. हे कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवण्याची गरज नाही, तसेच कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही..

Advertisement

कर्जासाठी कोण पात्र..?

  • ‘पीएनबी तत्काळ कर्ज योजने’चा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा शेत जमिनीचा भाडेकरू असावा.
  • बँकेच्या म्हणण्यानुसार, फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • शेतकऱ्यांकडे मागील दोन वर्षांचे अचूक बँक रेकॉर्ड असायला हवे.

किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 वर्षांत कर्जाची परतफेड करता येईल. शेतकऱ्यांना कर्जफेड करताना, कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर्जाचे हप्तेही कमी ठेवले आहेत.. शेतकऱ्यांना ‘पीएनबी’च्या कोणत्याही शाखेत या योजनेसाठी अर्ज करता येईल. तसेच, बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरही ऑनलाईन अर्ज करता येणार आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement