SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने 1 हजार रुपयांनी झालं स्वस्त, वाचा सोने-चांदीचे आजचे ताजे दर..

आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असेल तर आज सोने काहीसे स्वस्त मिळणार आहे. आज सोने-चांदीच्या किंमतीबद्दल (Gold-Silver Price) बोलायचे झाले तर आज सोने स्वस्त झाले असून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणून सध्याच्या सणासुदीच्या काळात दागिने खरेदीची चांगली संधी असून पैशाची बचत होणार आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार..

Advertisement

जर तुम्हाला (ता. 19 सप्टेंबर) आज सोन्याचे दागिने खरेदी करु वाटत असतील तर आज फारच कमी किंमतीत तुम्ही ते घेऊ शकणार आहात. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 100 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 1000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता.

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 45,850 रुपये एवढे झाले आहेत. याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 110 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,020 रुपयांच्या दराने तुम्ही खरेदी करू शकणार आहेत. तर चांदीचे दर आज स्थिर असून त्यांच्यात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे आज 1 किलो चांदी 56,700 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 46,320 रुपये
▪️ मुंबई – 45,850 रुपये
▪️ दिल्ली – 46,000 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,850 रुपये
▪️ बंगळुरू – 45,900 रुपये
▪️ हैदराबाद – 45,850 रुपये
▪️ पुणे – 45,880 रुपये
▪️ लखनऊ – 46,000 रुपये
▪️ नागपूर – 45,880 रुपये
▪️ नाशिक – 45,880 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,530 रुपये
▪️ मुंबई – 50,020 रुपये
▪️ दिल्ली – 50,170 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,020 रुपये
▪️ बंगळुरू – 50,070 रुपये
▪️ हैदराबाद – 50,020 रुपये
▪️ पुणे – 50,050 रुपये
▪️ लखनऊ – 50,170 रुपये
▪️ नागपूर – 50,050 रुपये
▪️ नाशिक – 50,050 रुपये

Advertisement

(तुमच्या शहरांतील अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या. त्यात व वरील दरांत किंचित फरक असू शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement