SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी, ‘हा’ नवीन नियम येणार..

देशभरातील सायबर फसवणुकीच्या प्रकरणे कमी होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड (credit card) आणि डेबिट कार्डधारकांसाठी (debit card) मोठी बातमी आणली आहे. आरबीआय च्या म्हणण्यानुसार व्यवहार करण्याच्या एका नियमात पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर पासून महत्वाचा बदल होणार आहे.

RBI ने दिलेल्या माहीतीनुसार..

Advertisement

▪️ आरबीआय आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन’ अशा नावाचा एक नियम आणणार आहे.

▪️ यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार हा नियम तसा 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार होता पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची मुदत पुढे ढकलून ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून 2022 अशी केली होती. नंतर आरबीआयने आपली शेवटची मुदत पुन्हा 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली.

Advertisement

▪️ आरबीआयने सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा ऑनलाईन, पॉइंट-ऑफ-सेल आणि ॲपमधील व्यवहार एकामध्ये एकत्र करून एक टोकन जारी करणार असल्याची माहीती दिली आहे.

▪️ जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकावा लागतो. सर्व माहिती अचूक भरली की तेव्हाच व्यवहार यशस्वी होतो.

Advertisement

▪️ टोकनायझेशन कार्ड तपशील “टोकन” नावाच्या पर्यायी कोडमध्ये रूपांतरित करेल. हे टोकन कार्ड, टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाईसवर अवलंबून असणार आहे. जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने स्टोअर केले जातात तेव्हा फसवणूक जास्त प्रमाणात टळते.

▪️ जेव्हा तुमच्याकडून तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर केली जाते तेव्हा तुमचा धोका कमी होतो. रिझव्‍‌र्ह बँकेने टोकन प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपूट करण्याची गरज भासत नाही.

Advertisement

▪️ तुमच्या कार्डची डिटेल टोकनायझेशनमध्ये एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाते. या कोडच्या साहाय्याने पेमेंट करणे शक्य होईल. या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या कार्डचा CVV नंबर आणि वन टाईम पासवर्डची गरज लागेल आणि अतिरिक्त पडताळणीसाठीही संमती द्यावी लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement