SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कमी बजेटमध्ये आकर्षक फीचर्स, ‘हे’ आहेत खूपच स्वस्त स्मार्टफोन..!

सध्याच्या डिजिटल युगात नवनवीन स्मार्टफोन्स आपल्याला डिजिटल करत आहेत. कॉम्प्युटर, लॅपटॉप नंतर अनेक जण आता मोबाईल वापरू लागले आहेत. कमी बजेटचा आणि खास फीचर्स असणारा मोबाईल फोन जर आपल्याला घ्यायचा असेल तर फीचर्सदेखील तसे यायला हवेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला असे 3 पर्याय सुचवणार आहोत, जिथे कॅमेरा, बॅटरी आणि रॅम देखील जबरदस्त मिळेल. या स्मार्टफोन्सच्या किंमती सेल किंवा ऑफरनुसार कमी किंवा जास्त होत असतात.

Nokia C30 : नोकिया C30 स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर मिळेल. हा आकर्षक स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 6.82 HD+ डिस्प्ले असलेला हा मोबाईल ग्रीन आणि व्हाईट रंगामध्ये उपलब्ध आहे. या हँडसेटमध्ये 13MP आणि 2MP चे दोन रिअर कॅमेरे आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 6000mAh बॅटरीसह, या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे.

Advertisement

Poco C31 : Poco C31 स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. 6.53 इंच HD+ डिस्प्लेसह हा फोन शॅडो ग्रे आणि रॉयल ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल. 5000mAH बॅटरी असलेल्या या मोबाईलमध्ये MediaTek G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटला 13 मेगापिक्सेलसह 2-2MP चे 3 रिअर कॅमेरे मिळतील. फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल्सचा आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजही मिळणार आहे.

Infinix Hot 12 : Infinix Hot 12 मध्ये 6.82 इंच HD+ डिस्प्ले आहे, MediaTek Helio G37 प्रोसेसर आहे. हा फोन 7 डिग्री पर्पल, एक्सप्लोरेटरी ब्लू, पोरल ब्लॅक, टर्क्वाइज सायन रंगांच्या व्हेरिएंटसह 9,999 रुपयांना मिळू शकतो. यात 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 2 मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि AI लेन्स मिळेल. सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. 4GB रॅम आणि 64GB रॅम असणाऱ्या या स्मार्टफोनची 6000mAh बॅटरी आपल्याला जबरदस्त अनुभव देईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement