SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. आततायीपणे कृती करू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus): विद्यार्थ्यांना चांगला दिवस जाईल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते. जोडीदाराची कृती खटकू शकते. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल, पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. जोडीदाराची काळजी घ्या.

मिथुन (Gemini) : मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी. एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल. घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखाल.

कर्क (Cancer) : योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. योग्य मूल्यमापन करावे. अति अपेक्षा ठेऊ नका. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका. मनःस्थिती द्विधा असेल. नाश्त्याला आज स्पेशल बनवाल.

सिंह (Leo) : मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. परिस्थितीत सुधारणा होईल. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आजचा दिवस अनकूल आहे. जिभेवर ताबा ठेवा. आज मनमोकळेपणाने बोलाल.

कन्या (Virgo) : प्रबळ इच्छेवर कामे होतील. नेहमी हसत बोलाल. उधार-उसनवार नको. प्रेरणा प्रामाणिक हवी. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

तुळ (Libra) : कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील. मुलांचा विचार समजून घ्या. प्रलंबित येणी मिळू शकतील. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. ऑफिसमध्ये विशिष्ट कामाला तुमचीच गरज लागेल.

वृश्‍चिक (Scorpio) : छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. अंदाज खरोखर ठरतील.

धनु (Sagittarius) : जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता आहे. पूर्व नियोजित कामे करावीत. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका. बोलण्याच्या भरात शब्द आणि शिवी देऊ नका. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. बोलण्यावर संयम ठेवा व कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. गरजेला मित्र आठवेल.

मकर (Capricorn) : तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. कशाचाही गैरफायदा घेऊ नका. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. जेवायला बाहेर जाल आणि फिरून याल तेव्हा एन्जॉय होईल.

कुंभ (Aquarious) : देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी. हट्टीपणा सोडावा लागेल. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

मीन (Pisces) : प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जवळचा प्रवास आज पुढे ढकलावा. आज तुम्ही आपला किंमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. बाहेर राहायला गेल्यास अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. सर्व आपलेच आहेत समजाल.

Advertisement