SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मारुती’च्या ‘या’ गाडीमध्ये आढळला फाॅल्ट, तुमच्याकडे आहे का ‘हे’ वाहन..?

‘मारुती सुझुकी’.. भारतातील नंबर वन कार उत्पादक कंपनी.. ‘मारुती’च्या कारला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळत असून, त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातही ‘मारुती’चे काही मॉडेल तर लोकांना भन्नाट आवडतात नि भारतीय बाजारात त्यांची चांगलीच चलती असल्याचे दिसते..

तुमच्याकडेही ‘मारुती सुझुकी’ (Maruti suzuki) कंपनीची कार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ‘मारुती’च्या गाड्यांना सर्वाधिक मागणी असली, तरी गेल्या काही दिवसांत या कंपनीच्या गाड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आल्या आहेत. विशेषत: या कारमध्ये ‘सील्ट बेल्ट’ची समस्या जाणवत असल्याचे बोलले जात आहे..

Advertisement

‘मारुती सुपर कॅरी’मध्ये समस्या..

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर सरकारने वाहनांच्या ‘सीट बेल्ट’वर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशालाही ‘सीट बेल्ट’ (Seat Belt) लावणं बंधनकारक केलं आहे. अशा वेळी तुमच्या कारमधील ‘सीट बेल्ट’ नीट काम करीत नसल्यास, ते तुमच्यासाठी जास्त त्रासदायक ठरू शकतो.

Advertisement

‘मारुती सुझुकी’ची ‘मारुती सुपर कॅरी’ या गाडीच्या ‘सीट बेल्ट’मध्ये समस्या जाणवत आहे. हे एक कर्मशिअल वाहन असून, त्याचा वापर ‘कार्गो’ म्हणून केला जाऊ शकतो. हे वाहन तीन प्रकारांत विकले जाते. वाहनाची किंमत 4.73 लाखांपासून सुरू होते. पेट्रोल प्रकारासाठी ही किंमत असून, त्याचे सीएनजी मॉडेल 5.93 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

‘सीट बेल्ट’च्या समस्येमुळे कंपनीने या गाडीचे एकूण 5,002 युनिट्स परत मागवले आहेत. ‘मारुती सुझुकी इंडिया’ने (MSI) त्यांच्या लाइट कमर्शिअल व्हिकल ‘सुपर कॅरी’ ड्रायव्हर साइड सीट बदलण्यासाठी वाहने परत मागवण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

‘मारुती सुझुकी’ने ‘स्टॉक एक्स्चेंज’ला ही माहिती पाठवली आहे. या माहितीनुसार, ‘सीट बेल्ट’ची समस्या असणाऱ्या गाड्यांचे उत्पादन 4 मे ते 30 जुलै 2022 दरम्यान करण्यात आले होते. चालकाच्या बाजूच्या ‘सीट बेल्ट’मध्ये दोष असल्याचा संशय आहे. त्यामुळे ‘सीट बेल्ट’ला जोडलेले बोल्ट तपासण्यासाठी, तसेच टॉर्क करण्यासाठी कंपनीने ही वाहने परत मागवली आहेत.

कंपनीला या गाड्यांच्या ‘सीट बेल्ट’च्या बोल्ट टॉर्कमध्ये दोष असल्याचा संशय असून, कालांतराने बेल्ट अधिक सैल होऊ शकतो. ‘मारुती सुझुकी’च्या अधिकृत वर्कशॉपद्वारे संबंधित वाहन मालकांना माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement