SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पावसाबाबत पंजाबराव डख यांचा नवा अंदाज, दिवाळीपर्यंत ‘असा’ राहणार पाऊस…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. विशेषत: विदर्भ-मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. माॅन्सून परतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते. मात्र, यंदा माॅन्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. माॅन्सूनचा वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा लांबणार आहे.

राजस्थानातून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस माॅन्सून (Monsoon Update) परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. गतवर्षी 6 ऑक्टोबर रोजी माॅन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते, मात्र यंदा त्यास उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..

Advertisement

दिवाळीतही पावसाचा जोर

रम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज समोर आला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र, त्यानंतर 21 ते 24 सप्टेंबरपर्यंत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळू शकतो. तसेच, 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे डख यांनी म्हटले आहे..

Advertisement

दिवाळीतही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असू शकतो. तसेच, यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवणार असून, राज्यात 28 ऑक्टोबरपासून थंडीला सुरुवात होणार असल्याची शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे..

सरासरीपेक्षा अधिक पाऊस..

Advertisement

महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात आतापर्यंत (16 सप्टेंबर) 1,149 मिमी पाऊस पडला आहे. राज्याची पावसाची सरासरी 916.6 असून, सध्या सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात 1,194.3 मिमी पाऊस पडला होता.

अर्थात, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील राज्याची पावसाची सरासरी 1004.2 एवढी आहे. यंदा सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के अधिक पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे. हा महिना संपण्यास अजून काही दिवस बाकी असल्याने यंदा रेकाॅर्डब्रेक पावसाची नोंद होऊ शकतो..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement