SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय संघाला धक्का, ‘या’ दिग्गज बाॅलरला कोरोनाची लागण..!!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.. ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिके विरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसह टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सप्टेंबरपासून मालिका सुरू होण्याआधीच ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का बसला आहे.

कांगांरूंचा सामना करण्यापूर्वी भारताच्या प्रमुख गोलंदाजाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतलीय. भारत व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मोहाली येथे दाखल झाले असले, संघासोबत शमी आलेला नाही.

Advertisement

भारताच्या ट्वेंटी-20 संघात 10 महिन्यांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शमीच्या मार्गात आता कोरोनाचे विघ्न आल्याने तो मालिकेबाहेर झाला आहे. ऑसींविरुद्धची मालिका 25 सप्टेंबरला संपणार असून, त्यानंतर लगेच 28 तारखेपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका सुरु होईल.

कोरोनातून सावरला, तरच आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शमीचा सहभाग होऊ शकतो. सध्या तरी त्याला घरीच 7 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याचा कोरोनाच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच संघासोबत तो सराव करू शकतो. सध्या त्याच्या जागी उमेश यादवचे नाव चर्चेत आले आहे.

Advertisement

दरम्यान, दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यांच्यासह या मालिकेसाठी मोहम्मद शमी, दीपक चहर यांचीही संघात निवड झाली. मात्र, ट्वेंटी-20 वर्ल्डकपसाठी राखीव खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश आहे..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

Advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक
– 20 सप्टेंबर- मोहाली
– 23 सप्टेंबर – नागपूर
– 25 सप्टेंबर- हैदराबाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ – रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,  दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

Advertisement

द. आफ्रिकेविरुद्धचे वेळापत्रक

– 28 सप्टेंबर- तिरुअनंतपूरम
– 2 ऑक्टोबर – गुवाहाटी
– 4 ऑक्टोबर- इंदूर

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement