SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हिरो स्प्लेंडर’ आता नव्या रुपात, कमी किंमतीत दमदार मायलेज..!!

‘हिरो मोटोकाॅर्प’ची सर्वात लोकप्रिय बाईक म्हणजे, ‘स्प्लेंडर’.. गेल्या काही वर्षांपासून या बाईकचं गारुड भारतीय मनावर कायम आहे. बाईक मार्केटमध्ये आजही या ‘स्प्लेंडर’ची सर्वाधिक विक्री होते. भारतात दर महिन्याला या बाईकचे सरासरी 2.5 लाख युनिट्स विकले जातात. अन्य कोणत्याही बाईकपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे..

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘हिरो मोटोकाॅर्प’ कंपनीने आपल्या सर्वात आवडत्या ‘स्प्लेंडर प्लस’ (Splendor Plus) बाईकचे नवे माॅडेल भारतीय बाजारात सादर केले आहे. या बाईकच्या कलरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, आता एकूण 6 कलरमध्ये ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.. कलर व्यतिरिक्त ही बाईक आहे तशीच आहे..

Advertisement

हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) कंपनीने ‘स्प्लेंडर प्लस’साठी नवीन पेंट स्किम सादर केली आहे. आता ही बाईक नवीन ‘सिल्व्हर नेक्सस ब्लू’ कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. शिवाय, आता ही बाईक हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, मॅट शील्ड गोल्ड, ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड, ब्लॅक विथ पर्पल, सिल्व्हर नेक्सस ब्लू, अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

‘स्प्लेंडर प्लस’ची वैशिष्ट्ये..

Advertisement
  • ‘हिरो’ची ही कम्युटर बाईक 97.2cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनवर आधारित आहे. जी 8,000 rpm वर 7.9 bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm चा हाय टॉर्क निर्माण करते.
  • i3S आयडियल स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह बाईक 4-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सशी जोडलेली आहे.
  • बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स असतील.
  • स्प्लेंडरमध्ये आता इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीमही देण्यात आली आहे.
  • बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स व ड्युअल स्प्रिंग-लोडेड रियर शॉक ऍब्जॉर्बर दिले आहेत.

किंमत – ‘हिरो स्प्लेंडर प्लस’ (Hero Splendor Plus) या बाईकची देशातील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये आहे.. त्याच्या ‘हाय एंड व्हेरिएंट’ची किंमत 72,978 रुपयांपर्यंत जाते.. काही दिवसांपूर्वीच कंपनीने ही बाईक ‘हिरो स्प्लेंडर XTEC’ या नवीन हायटेक व्हर्जनमध्ये सादर केली होती..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement