SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कर्जमुक्ती योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी तत्कालिन राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यात शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले.. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

ठाकरे सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व शिंदे सरकार सत्तेवर आले.. शिंदे सरकारने या योजनेसाठीचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

2350 कोटींच्या निधीची तरतूद

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 2350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Advertisement

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या या निधी वाटपासाठी सहकार सहायक निबंधक (अंदाज व नियोजन) यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, सहकारी संस्थेच्या लेखाधिकाऱ्यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमले आहे. हा निधी वेळेत खर्च होईल, याची सहकार आयुक्त व निबंधकांनी दक्षता घ्यावी. याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

दरम्यान, 2017-18-19-20 या काळात नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे. या अनुदानाचे वाटप याच महिन्यापासून (सप्टेंबर) केले जाणार आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीवर 6000 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे सांगितले जाते..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement