SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बेरोजगारांसाठी खुशखबर..!! सरकारी नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. राज्यात पुढील काळात तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांची पदभरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या नोकर भरतीमध्ये प्राध्यापकांचीही भरती केली जाणार आहे. अर्थात, जी पदे मंजूर आहेत, त्याचीच भरती होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले..

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त (अमृत महोत्सव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

थोडा धीर धरावा…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की “आम्हाला सत्तेत येऊन दोनच महिने झाले आहेत. त्यामुळे थोडा धीर धरावा. दोन महिन्यांपूर्वी आम्ही ‘मोठा कार्यक्रम’ केल्यानंतर सत्तेत येताच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संतपीठ, वसतीगृह विस्तारीकरण, अध्यासन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुलासह विद्यापीठाने ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांना निधी दिला जाईल..”

Advertisement

गेल्या 5-6 वर्षांपासून सरकारी नोकर भरती झालेली नाही. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादनशुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे..

राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून युद्ध पातळीवर सरकारी मेगाभरतीचे नियोजन सुरु आहे. मात्र, दिवाळादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरनंतरच 25 ते 50 हजार पदभरती होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

राज्य सरकारच्या एकूण 29 प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वा दोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पुढील काळात 100 टक्के पदभरती होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी 15 दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement