SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रिकेटमध्ये येणार नवा नियम, संघांचा होणार मोठा फायदा..

क्रिकेट खेळाला अधिक आकर्षक, गतिमान, मनोरंजक बनवण्यासाठी सातत्याने नियमांत बदल केले जातात. काही अनोखे नियम स्वीकारले जातात, तर काही कालबाह्य नियम हटवले जातात. नव्या नियमांमुळेच हा खेळ दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत असल्याचे पाहायला मिळते..

भारतीय क्रिकेट अधिक मनोरंजक बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात ‘बीसीसीआय’ (BCCI) टी-20 क्रिकेट प्रकारात नवा नियम लागू करणार आहे. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ असं या नियमाचं नाव आहे.. नव्या नियमानुसार, फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल, तसेच बेसबॉल खेळांप्रमाणेच मॅच सुरु असतानाच टीमला त्यांच्या संघातील खेळाडू बदलता येणार आहे..

Advertisement

‘बीसीसीआय’ने सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत हा नियम यशस्वी झाल्यास आगामी काळात ‘आयपीएल’मध्येही त्याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले..

वास्तविक, ‘आयसीसी’ने 2005 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला होता. मात्र, नंतर वर्षभरातच हा नियम काढून टाकण्यात आला.. आता ‘बीसीसीआय’ पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्याचा विचारात आहे. नंतर हा नियम ‘आयपीएल’मध्येही आणला जाईल. त्यामुळे खेळ अधिक रंजक होणार असल्याचा दावा केला जात आहे..

Advertisement

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाबाबत…

‘बीसीसीआय’च्या या नव्या नियमानुसार, मॅचच्या टॉसच्या वेळी कॅप्टनला 4 ऑप्शनसह त्यांची प्लेइंग-11 जाहीर करावी लागेल. मात्र, सामना सुरु झाल्यानंतर संघाला 4 पैकी एकच पर्याय वापरता येईल. मॅचच्या 14 व्या ओव्हरपर्यंत संघाला पर्यायी खेळाडूला मैदानात पाठवता येईल. त्यासाठी मैदानावरील अंपायर किंवा थर्ड अंपायरना ओव्हरच्या शेवटी माहिती द्यावी लागेल.

Advertisement

कर्णधार/मुख्य प्रशिक्षक/टीम मॅनेजमेंट यांपैकी कोणीही अंपायरला ही माहिती देऊ शकतो. ज्या खेळाडूच्या जागी नवीन खेळाडू पाठवला जाईल, तो खेळाडू नंतर संपूर्ण सामन्यातून बाहेर राहील.. त्याला फिल्डिंगही करता येणार नाही. सामन्याची रणनीती व परिस्थितीनुसार संघाला हा निर्णय घेता येणार असल्याचे सांगण्यात आले..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement