SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ भन्नाट इलेक्ट्रिक स्कुटी लॉंच, एकदा चार्ज करून 160 किमी धावणार..

इलेक्ट्रिक बाइकमध्ये आजकाल अनेक जण इंटरेस्ट घेत आहेत. आपल्या देशात दुचाकींची सर्वाधिक संख्या असताना आता ती आणखी वाढतच आहे. प्रदूषणाला आळा बसावा आणि इंधनाची गरज नसल्याने व पेट्रोलचा खर्च वाचतो म्हणून अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक बाईकला प्राधान्य दिलं जात आहे. तसेच इलेक्ट्रिक बाईकमध्ये मिळणारे विविध आकर्षक फीचर्स, किंमत आणि जास्त रेंज मिळत असेल तर आपण ती खरेदी करत असतो. अशीच एक जबरदस्त स्कूटर ‘ओकाया फास्ट’ मार्केटमध्ये लॉन्च (Okaya Electric Vehicle Launched) झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओकाया फास्ट ही सुंदर डिझाईन असलेली एक खास इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ती एकाच चार्जवर मोठी रेंज देते, असा कंपनीने दावा केला आहे. चला तर मग आज Okaya Faast Scooter ची किंमत, फीचर्स, रेंज, बॅटरी व स्पेसिफिकेशन्स पाहुयात..

Advertisement

ओकाया फास्ट ला कंपनीने 1.9 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीस लॉंच केल्याचं समजत आहे. ही सुरुवातीची किंमतसुद्धा त्याची ऑन रोड किंमत आहे, अशी माहीती आहे.

ओकाया फास्टचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स (Okaya Faast Features & Specifications):

Advertisement

▪️ ओकाया फास्टमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, डिजिटल ट्रिप मीटर, सेंट्रल लॉकिंग, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, डीआरएल, फास्ट चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म दिला जाईल.

▪️ एलईडी टर्न, सिग्नल लॅम्प अशा काही फीचर्ससह, मोटार लॉक, 3 ड्राइव्ह मोड ही इतर खास फीचर्सही देण्यात आली आहेत.

Advertisement

▪️ स्कूटरच्या पुढील आणि मागील चाकांवर, ओकायाने ड्रम ब्रेक्सचे कॉम्बिनेशन Alloy Wheel आणि ट्यूबलेस टायर्ससोबत बसवले आहे.

▪️ स्कूटरच्या रेंज व स्पीडबद्दल कंपनीने स्कूटर एका चार्जमध्ये 140 ते 160 किमी धावू शकते, असं म्हटलं आहे आणि या रेंजसोबतच 70 किमी/तास स्कूटरचा असा टॉप स्पीडचा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement

▪️ सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 5 ते 6 तासांत संपूर्ण चार्ज होईल आणि या बॅटरी पॅकवर 3 वर्षांचा वॉरंटी प्लॅन येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement