SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

IPL : मुंबई इंडियन्स, पंजाब संघांचा मोठा निर्णय, अनिल कुंबळेला धक्का…

ऑस्ट्रेलियात होणारी ‘टी-20 वर्ल्डकप’ स्पर्धा तोंडावर आलेली असताना, विविध देशांचे खेळाडू या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत. दुसरीकडे जगातील सर्वात मोठी क्रिकेट लिग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लिग… अर्थात ‘आयपीएल’मधील संघबांधणीलाही मोठा वेग आल्याचे दिसते..

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्यांचा हेड कोच श्रीलंकेचा माहेला जयवर्धने याला प्रमोशन देताना जागतिक जबाबदारी देत फ्रेंचायजीचा ‘ग्लोबल परफॉर्मन्स’ हेड केले आहे. त्याच्या रिक्त जागी ‘मुंबई इंडियन्स’ने आगामी ‘आयपीएल’साठी दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेट किपर मार्क बाऊचरची ‘हेड कोच’ म्हणून निवड केलीय.

Advertisement

मार्क बाऊचर सध्या दक्षिण आफ्रिका संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र, आगामी ‘टी-20 वर्ल्डकप’नंतर तो आपल्या पदावरून पायउतार होणार आहे. त्यानंतर तो आता ‘आयपीएल’च्या ग्लॅमरस दुनियेत झळकणार आहे.. ‘मुंबई इंडियन्स’ सारख्या दिग्गज संघाला तो मार्गदर्शन करताना दिसणार आहे..

‘पंजाब’चा कुंबळेला दणका..

Advertisement

‘मुंबई इंडियन्स’पाठोपाठ ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघानेही आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केलीय. भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याला दणका देताना, ‘पंजाब’ने त्याच्यासोबतचा करार संपुष्टात आणलाय. त्याच्या जागी आता ‘आयपीएल-2023’मध्ये पंजाबच्या हेड कोचपदी ट्रेव्हर बेलिस यांची निवड केली आहे.

सोशल मीडियावरून पंजाब किंग्सने याबाबतची घोषणा केली. बेलिस यांनी याआधीही ‘आयपीएल’मधील ‘कोलकाता नाइट रायडर्स’ व ‘सनरायझर्स हैदराबाद’ या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद म्हणून काम केलं आहे..

Advertisement

कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘पंजाब’ संघ 2020 व 2021 मध्ये पाचव्या स्थानावर राहिला. तसेच 2022 मध्ये एकूण 10 संघ असताना, पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर होता. कुंबळेला अपेक्षित निकाल देता न आल्याने फ्रँचायझीने त्याचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कुंबळेच्या जागी आता बेलिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement