SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने 400 तर चांदी 600 रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे ताजे दर..

आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. तर चांदीही स्वस्त झाली आहे. जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) कमी झाल्याने तुम्हाला अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. देशात काही दिवसांपासून किंमत स्थिर नसल्याने बाजाराचे वातावरण अस्थिर बनले आहे. आज तुम्हाला खरेदीची मोठी संधी असून ग्राहकांनी खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचंही दिसत आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार,

Advertisement

आज (ता. 15 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज फारच कमी किंमतीत मिळणार आहेत. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 400 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 4000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता.

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झाले आहेत. याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 440 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 49,960 रुपयांना मिळत आहे. तर चांदी किलोमागे 600 रुपयांनी घसरली असून आज 1 किलो चांदी 56,400 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 46,260 रुपये
▪️ मुंबई – 45,800 रुपये
▪️ दिल्ली – 45,950 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये
▪️ बंगळुरू – 45,850 रुपये
▪️ हैदराबाद – 45,800 रुपये
▪️ पुणे – 45,830 रुपये
▪️ लखनऊ – 45,950 रुपये
▪️ नागपूर – 45,830 रुपये
▪️ नाशिक – 45,830 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 50,460 रुपये
▪️ मुंबई – 49,960 रुपये
▪️ दिल्ली – 50,120 रुपये
▪️ कोलकत्ता – 49,960 रुपये
▪️ बंगळुरू – 50,020 रुपये
▪️ हैदराबाद – 49,960 रुपये
▪️ पुणे – 49,980 रुपये
▪️ लखनऊ – 50,120 रुपये
▪️ नागपूर – 49,980 रुपये
▪️ नाशिक – 49,980 रुपये

Advertisement

(तुमच्या शहरांतील दर देखील कमी होण्याची शक्यता असल्याने तुमच्या शहरातील अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement