SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा, अखेरचा सामना ‘येथे’ खेळणार..

टेनिस सम्राट म्हणून ख्याती असलेला स्वित्झर्लण्डचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 41 वर्षीय फेडररने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रॉजर फेडररने (Roger Federer) ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.

रॉजर फेडरर पुढील आठवड्यामध्ये लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर चषक टेनिस स्पर्धेत फेडरर व्यावसायिक स्तरावर टेनिस खेळताना दिसेल. त्यानंतर तो निवृत्त होणार आहे. रॉजर फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा विक्रम देखील फेडररच्या नावावर होता. आता तो संयुक्त दुसर्‍या स्थानावर आहे. राफेल नदालने यावर्षी त्याचा विक्रम मोडला.

Advertisement

फेडररने दुखापतीमुळे यावर्षी एकही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यापूर्वी रॉजर फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून आपले शेवटचे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकले होते. तेव्हा त्याने अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मारिन सिलिकला पराभूत केलं होतं. तेव्हा तो 20 ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला. रॉजर फेडररने 2021 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये सहभाग नोंदविला.

फेडररने 2003 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावताना पहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते. त्यानंतर त्याने 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 1 फ्रेंच ओपन, 8 विम्बल्डन आणि 5 यूएस ओपन विजेतेपदे जिंकली होती. फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर जिंकलेल्या एकूण ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या बाबतीत तो तिसर्‍या स्थानावर आहे.

Advertisement

रॉजर फेडररने पोस्टमध्ये लिहिलंय की..

“मी 41 वर्षांचा असून मी मागील 24 वर्षांमध्ये 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. मी कधीही कल्पना केली नव्हती, त्याही पेक्षा जास्त प्रेम मला टेनिसकडून मिळाले आहे. आता पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या लंडनमधील लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असणार आहे. अर्थातच मी भविष्यात आणखी टेनिस खेळेल, पण ग्रँडमध्ये नाही. पत्नीबद्दल भावनिक होऊन तो म्हणतो की, फायनलपूर्वी तिने मला खूप प्रोत्साहन दिले, त्यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर असतानाही तिने खूप सामने पाहिले आणि 20 वर्षांहून अधिक काळ ती माझ्यासोबत आहे”, असे त्याने ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement