SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

16 सप्टेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ MHT CET निकाल सीईटी सेलकडून जाहीर: एकूण 27 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण, PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण

✒️ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा झटका बसणार, 1 एप्रिल 2023 पासून 2030 पर्यंत टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार

Advertisement

✒️ औरंगाबाद येथे 17 व 18 सप्टेंबरला होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात 5 हजारांपेक्षा अधिक रोजगार संधी उपलब्ध, ‘महास्वयम’ च्या वेबसाईटवर घ्या अधिक माहीती

✒️ कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आनंदाची बातमी, “अजून कोरोना संपलेला नाही, मात्र कोरोनाचा शेवट जवळ आहे”, असं विधान

Advertisement

✒️ दिल्लीतील एका हॉटेल मालकाने बनविली खास 56 इंच मोदी थाळी, थाळीमध्ये 56 पदार्थ असणार; जे जोडपं 40 मिनिटांमध्ये थाळी संपवेल त्याला 8.5 लाख रुपये बक्षीस

✒️ मुंबईत दूधात भेसळ करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, कारवाईत 60 हजार 600 रुपये इतक्या किंमतीचे 1 हजार 10 लिटर भेसळयुक्त दूध जप्त

Advertisement

✒️ न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत ऋतुराज गायकवाडचं दमदार शतक, भारत अ संघाकडून खेळताना ऋतुराजची
127 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांसह 108 धावांची खेळी

✒️ देशभरात 2021 मध्ये एकूण 31,677 बलात्काराचे गुन्हे दाखल, म्हणजेच देशात रोज 86 पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार; राजस्थान पहिला, महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

Advertisement

✒️ मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत आता बदल, बालन्याय कायदा 2015 मध्ये 1 सप्टेंबर 2022 पासून सुधारणा; दत्तक विधान देण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

✒️ ‘ब्रह्मास्त्र’ची बॉक्स ऑफिसवर जादू, काल सहाव्या दिवशी जमवला मोठा गल्ला, चित्रपटानं केली जवळपास 161 कोटींपेक्षा जास्त कमाई

Advertisement

✒️ कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटात जिंकले कांस्यपदक; जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement