SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल. नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल. आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे.

वृषभ (Taurus): माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल. ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या.

Advertisement

मिथुन (Gemini) : हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत. समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

कर्क (Cancer) : ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

Advertisement

सिंह (Leo) : कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात. सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

कन्या (Virgo) : लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल. झालेली चूक काबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका.

Advertisement

तुळ (Libra) : मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल.

वृश्‍चिक (Scorpio) : शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा. मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

Advertisement

धनु (Sagittarius) : मनात हेतू ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका. आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा.

मकर (Capricorn) : सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल. नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा. मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

मीन (Pisces) : कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे. घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. तुळ व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे.

Advertisement