SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयसीसीने टी-20 रँकिंग केली जाहीर, कोहलीची झेप, सुर्या चमकला..

आशिया चषक 2022 मध्ये सर्वच क्रिकेट संघांचा परफॉर्मन्स जवजवळ चांगला राहिला आहे. Asia Cup 2022 वर श्रीलंका क्रिकेट संघाने नाव कोरल्यानंतर आता आयसीसीने बेस्ट टी-20 क्रिकेट टीम आणि बेस्ट T-20 प्लेयर्सची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू आणि संघाचा दबदबा दिसत आहे. भारतीय संघ आयसीसी टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. जाणून घेऊयात रँकिंगमध्ये कोणत्या नंबरवर कोण आहेत..

आयसीसीने फलंदाजीची ताजी क्रमवारी जाहीर केली. त्यात विराट कोहलीला (Virat Kohli) आशिया कपमध्ये शानदार रन्स केल्यामुळे जास्त फायदा झाला आहे. आशिया कपपूर्वी 33 व्या क्रमांकावर असलेला कोहली आता टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत 15 व्या स्थानावर आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 14 व्या क्रमांकावर आहे. तर विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोनच भारतीय आहेत ज्यांचा तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत टॉप 15 मध्ये समावेश आहे.

Advertisement

ICC ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार टॉप-10 फलंदाज:

मोहम्मद रिझवान
ॲडम मार्करम
बाबर आझम
सूर्यकुमार यादव
डेव्हिड मलान
ॲरॉन फिंच
डेव्हिड कॉनवे
पाथुम निसांका
मोहम्मद वसीम
हेंड्रिक्स

Advertisement

ICC ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार टॉप-10 गोलंदाज:

जोश हेजलवुड
तबरेज शम्सी
आदिल रशीद
ॲडम झम्पा
राशिद खान
वनिंदू हसरंगा
भुवनेश्वर कुमार
महिश तीक्षणा
मुजीब उर रहमान
अकिल हुसेन

Advertisement

आयसीसी टी-ट्वेंटी ऑल राऊंडर रँकिंग:

शकीब अल हसन
मोहम्मद नबी
मोईन अली
वनिंदू हसरंगा
ग्लेन मॅक्सवेल
जे. जे. स्मिट
हार्दिक पंड्या
झिशान मक्सूद
रोहन मुस्तफा
दीपेंद्र ऐरी
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement