SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने 2 हजार रुपयांनी झालं स्वस्त, वाचा सोने-चांदीचा आजचा दर..

आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर आज काहीसे वाढले आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक वेळा सोन्याचे दर कमी होत आहे तर गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी (Gold-Silver Price) खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानात गर्दी करत आहेत. कारण काही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे, शेअर बाजार व इतर अनेक कारणांमुळे परिणाम होऊन देशात सततच्या बदलणाऱ्या सोने-चांदीच्या किंमतीत बरीच तफावत दिसून नेहमी कमी-जास्त होत आहेत.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार,

Advertisement

आज (ता. 15 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज फारच कमी किंमतीत मिळणार आहेत. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 200 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता. भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 200 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 46,200 रुपयांना मिळत आहे.

याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 220 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,400 तर 100 ग्रॅम सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदी किलोमागे 600 रुपयांनी महागली असून आज 1 किलो चांदी 57,000 रुपयांना मिळत आहे. तर 1 ग्रॅम चांदी फक्त 57 रुपयांच्या जवळपास खरेदी करता येणार आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 46,800रुपये
▪️ मुंबई – 46,200 रुपये
▪️ दिल्ली – 46,350 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,200 रुपये
▪️ बंगळुरू – 46,250 रुपये
▪️ हैदराबाद – 46,200 रुपये
▪️ पुणे – 46,230 रुपये
▪️ लखनऊ – 46,350 रुपये
▪️ नागपूर – 46,230 रुपये
▪️ नाशिक – 46,230 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,050 रुपये
▪️ मुंबई – 50,400 रुपये
▪️ दिल्ली – 50,560 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,400 रुपये
▪️ बंगळुरू – 50,450 रुपये
▪️ हैदराबाद – 50,400 रुपये
▪️ पुणे – 50,430 रुपये
▪️ लखनऊ – 50,560 रुपये
▪️ नागपूर – 50,430 रुपये
▪️ नाशिक – 50,430 रुपये

Advertisement

(देशातील महत्वाच्या शहरांतील दर आणि तुमच्या शहरातील दर यांमध्ये किंचित फरक असू शकतो. अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement