SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने 3,000 रुपयांनी स्वस्त? चांदीचे दरही आपटले, वाचा मोठी बातमी..

सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळतेय. कालपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे तर चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या बाजारात सोने-चांदी अनेक वेळा स्वस्त आणि महाग झाले आहेत. आज (ता. 14 सप्टेंबर) देखील सोने-चांदीची किंमत कमी झाली असून जर तुम्हाला नवनवीन दागिने खरेदी करायचे असतील, तर सोन्याचे व चांदीचे दागिने खरेदी करताना तुम्हाला अगदी कमी किंमतीत (Gold-Silver Price) मिळणार आहेत.

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 330 रुपयांनी तर 100 ग्रॅम सोने 3,330 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता. भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 330 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 46,400 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 360 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,620 रुपयांना मिळत आहे. तर 100 ग्रॅम सोने 6800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदी किलोमागे 600 रुपयांनी स्वस्त झाली असून आज 1 किलो चांदी 56,400 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 47,010 रुपये
▪️ मुंबई – 46,400 रुपये
▪️ दिल्ली – 46,550 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,400 रुपये
▪️ बंगळुरू – 476,450 रुपये
▪️ हैदराबाद – 46,400 रुपये
▪️ पुणे – 46,430 रुपये
▪️ लखनऊ – 46,550 रुपये
▪️ नागपूर – 46,430 रुपये
▪️ नाशिक – 46,430 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,280 रुपये
▪️ मुंबई – 50,620 रुपये
▪️ दिल्ली – 50,780 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,620 रुपये
▪️ बंगळुरू – 50,680 रुपये
▪️ हैदराबाद – 50,620 रुपये
▪️ पुणे – 50,650 रुपये
▪️ लखनऊ – 50,780 रुपये
▪️ नागपूर – 50,650 रुपये
▪️ नाशिक – 50,650 रुपये

Advertisement

(देशातील महत्वाच्या शहरांतील दर आणि तुमच्या शहरातील दर यांमध्ये किंचित फरक असू शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन दर माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement