SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फ्लिपकार्टकडून धमाकेदार सेलची घोषणा, ‘या’ वस्तूंवर 80 टक्के डिस्काउंट मिळणार..

देशात सध्या अनेक सण आणि उत्सव साजरे होत आहेत. यामुळे आणि सध्या राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमूळे आपल्याला घराबाहेर पडणे कधी कधी शक्य होत नाही. म्हणून आपण ऑनलाईन वेबसाईट्स किंवा E-Commerce App वरून खरेदी करत असतो. कॅशबॅक आणि इंस्टंट डिस्काउंट मिळत असल्याने ग्राहक ऑफर्सकडे जास्त आकर्षित होत असतात. आता फ्लिपकार्टने एका जबरदस्त सेलची घोषणा केली आहे.

दरम्यान अमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल देखील 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टने सेलची घोषणा केली असून Flipkart ने 13 सप्टेंबर 2022 रोजी बिग बिलियन डेज सेलच्या 9व्या एडिशनची तारीख देखील जाहीर केली होती. त्यानुसार फ्लिपकार्टचा Flipkart Big Billion Days 23 सप्टेंबरला चालू होत आहे. फ्लिपकार्टच्या या बिग बिलियन डेज सेलची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असून या दिवसापर्यंतच तुम्हाला अधिक सूट आणि जबरदस्त ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

Advertisement

फ्लिपकार्टने माहिती दिली आहे की, सेल सुरू होण्याआधी यूजर्स 1 रुपये भरून इलेक्ट्रॉनिक्स, घर, सौंदर्य यासह अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सची आगाऊ बुकिंग करू शकतील. Flipkart सेलपूर्वी ‘कूपन रेन’ चा गेमसुद्धा उपलब्ध असणार आहे. या माध्यमातून यूजर्स त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत खेळून रिवॉर्ड जिंकू शकणार आहेत.

फ्लिपकार्टने माहिती दिली की, “सेलमध्ये 130 स्पेशल एडिशन प्रोडक्टसह 90 पेक्षा अधिक ब्रँड्समधील 10 हजाराहून अधिक नवीन प्रोडक्ट विक्रीस आणणार आहेत. प्रत्येक कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट, कॅशबॅक, बँक ऑफर मिळण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला वेगवगळ्या मोबाईल ब्रॅंड्सवर सूट देखील मिळेल, जसे कि Poco, Realme, Samsung आणि Vivo सह इतर अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळू शकणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि एक्सेसरीजवर 80 टक्के डिस्काउंट दिलं जाईल. फ्लिपकार्टने या सेलमध्ये बँक कार्डद्वारे 10 टक्के डिस्काउंट जाहीर केलं आहे.

Advertisement

Axis Bank आणि ICICI बँक यांनी Flipkart Big Billion Days सेलसाठी भागीदारी केली आहे. म्हणजेच ग्राहकांना ICICI बँक आणि Axis बँक कार्डद्वारे खरेदीवर 10 टक्के झटपट सूट घेता येईल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जाईल. सेलमध्ये ग्राहकांना फ्लिपकार्ट पे लेटर सुविधेचा लाभही घेता येणार आहे जेणेकरून तुम्ही वस्तू घेऊन नन्तर पैसे देऊ शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement