SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. कोर्टाशी निगडीत कोणताही मुद्दा अडकला असेल तर आज त्यात काहीसा दिलासा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. कार्यात लाभदायक फळांचे महत्त्व कायम राहील. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील.

वृषभ (Taurus): कृतीशून्य असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही आश्‍वासन, शब्द देऊ नका. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात.

Advertisement

मिथुन (Gemini) : कार्यसिद्धी योग. आर्थिक नियोजन कराल. अनावश्यक खर्च टाळावा. मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील.

कर्क (Cancer) : कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. मानसिक ताण जाणवेल. अतिविचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील. वरिष्ठांची मर्जी राखाल. योग्य व्यवस्थापनामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील.

Advertisement

सिंह (Leo) : सोडून द्यायला शिका. गोष्टी उगाळत बसल्यामुळे मनाचे स्वास्थ्य बिघडेल. महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होतील.

कन्या (Virgo) : प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल.

Advertisement

तुळ (Libra) : सहजपणाने कार्य करा. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल.

वृश्‍चिक (Scorpio) : आज तुम्ही नवीन प्रयोग कराल. जिद्दीने खेळात सहभागी व्हाल आणि यशस्वीही व्हाल. भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. व्यवसायात चमक दाखवाल.

Advertisement

धनु (Sagittarius) : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. निर्णय घेताना घाई नको. शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. काही प्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. आकाश अधिक तेजस्वी दिसेल.

मकर (Capricorn) : मनोनिग्रह महत्त्वाचा आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक वाद संपतील. कुटुंबात सामंजस्य राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : आवडत्या व्यक्‍तींना वेळ द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल. समज-गैरसमज दूर होतील. संतुलन साधल्यामुळे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन (Pisces) : सज्जनांचा सहवास लाभेल. चांगल्या स्वभावामुळे व चारित्र्यामुळे मानसन्मान होतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल.

Advertisement