SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ सेकंड हँड स्कूटर ईएमआयवर खरेदी करता येणार, बजेट फक्त 30 हजार रुपये..

सध्याची महागाई पाहता दुचाकी क्षेत्रातील स्कूटर अनेकांना नवीन घेणे खिशाला परवडत नाही. नवीन दुचाकीच्या किंमती काही दिवसांपूर्वी वाढल्याने त्या सध्या सामान्य माणसांसाठी न परवडणाऱ्या आहेत. यासोबतच जर तुम्ही स्कूटरचे फॅन असाल आणि तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर बजेटमध्ये घेण्यासाठी सेकंड हँड खरेदी करावी लागणार आहे. यासाठी जाणून घ्या खास ऑफर्सबद्दल..

देशात स्कूटरमध्ये होंडा कंपनीच्या Activa स्कूटर्सची विक्रमी विक्री झालेली आहे. यासह अधिक मागणी असलेली यातील Honda Activa 6G ही स्कूटर देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर देखील ठरली आहे. कंपनीने ही स्कूटर तीन व्हेरिएंटसह बाजारात लॉंच केली आहे.

Advertisement

जर नवीन Honda Activa 6G खरेदी करायची असेल तर तुम्हाला अंदाजे एक्स-शोरूम किंमत 73,400 ते 75,400 रुपये मोजावे लागतील. ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 60 किमी मायलेज देते असं ARAI ने प्रमाणित केलेलं आहे, असा कंपनीचा दावा आहे. शोरूममधून जर ही स्कूटर खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर खालील ठिकाणी तुम्ही अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकाल.

Honda Activa 6G सेकंड हँड खरेदी करण्यासाठी खरेदी करण्याची पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर असून तिथे सर्व माहीती दिली आहे. येथे या स्कूटरचे 2020 चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत 30 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळेल, म्हणजे तुम्ही ठराविक रकमेचा हप्ता दर महिण्याला भरू शकतात.

Advertisement

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर असून तिथे स्कूटरची माहीती लीस्ट केली आहे. येथे Honda Activa 6G चे 2021 मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केली आहे आणि संपूर्ण माहितीही देण्यात आली आहे. यासाठी 38,500 रुपये किंमत ठेवली गेली आहे, परंतु तुम्हालाही कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही. एकदाच संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.

Honda Activa 6G साठी तिसरी ऑफर BIKE4SALE वेबसाइटवर आहे, जी सेकंड हँड बाईक विकते. येथे Honda Activa 6G चे 2020 चे मॉडेल 36,900 रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या स्कूटरमुळे तुम्हाला प्लॅन किंवा कर्ज मिळणार नाही. तुम्हाला आधीच वन टाईम पेमेंट करावे लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement