SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

माॅन्सूनचा कहर कायम; पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा..

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणे ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय. मात्र, तरीही माॅन्सूनचा कहर सुरुच आहे..

सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून (Monsoon Prediction) कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले असून, पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील. विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा (Heavy rain) इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Advertisement

‘तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं..

हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिलीय. “मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील 2-3 दिवस असाच पाऊस सुरू राहू शकतो. काळजी घ्या आणि सतर्क राहा, असे आवाहन करतानाच, ‘तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं..’ असं तर हा माॅन्सून सांगत नाही ना..” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे..

Advertisement

‘या’ जिल्ह्यांना इशारा

Advertisement

बुधवारी – मुंबईसह ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात, तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा.
गुरुवारी – मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, रत्नागिरी व सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज

शुक्रवारी – पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट,  तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पावसाची शक्यता
शनिवारी –  रायगड आणि रत्नागिरी वगळता पावसाचा जोर कमी होईल.

Advertisement

मासेमारी व्यवसाय ठप्प

समुद्रात ताशी 45 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, असा संदेश दिला आहे. मासेमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. आणखी दोन-तीन दिवस हे वातावरण कायम राहू शकते. त्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement