SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोने ‘एवढ्या’ रुपयांनी झाले स्वस्त..

सोने आज स्वस्त झाले असून खरेदीची आज मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हालाही सोन्याचे आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असेल तर आज तुम्ही खरेदी करू शकता. सोन्याच्या किंमतीत सतत होणारी घसरण तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी एक संधी असते. आज सोने स्वस्त तर चांदीचे दर काहीसे वाढले असून आज (दि.13 सप्टेंबर) जर तुम्हाला खरेदी करायची असेल, तर सोने तुम्हाला कमी दरात (Gold-Silver Price) मिळणार आहे. कारण आज एक तोळा सोने 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

गुडरिटर्न्स वेबसाईटच्या माहीतीनुसार, भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 200 रुपयांनी स्वस्त होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आज राज्यात 46,730 रुपयांना मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 200 रुपयांनी स्वस्त झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 50,980 रुपयांना मिळत आहे. तर आज 1 किलो चांदीचे दर तब्बल 1800 रुपयांनी वाढले झाले असून 57,000 रुपयांना चांदी मिळत आहे.

Advertisement

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 47,250 रुपये
▪️ मुंबई – 46,730 रुपये
▪️ दिल्ली – 46,880 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,730 रुपये
▪️ बंगळुरू – 46,780 रुपये
▪️ हैदराबाद – 46,730 रुपये
▪️ पुणे – 46,760 रुपये
▪️ लखनऊ – 46,880 रुपये
▪️ नागपूर -46,760 रुपये
▪️ नाशिक – 46,760 रुपये

Advertisement

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ चेन्नई – 51,550 रुपये
▪️ मुंबई – 50,980 रुपये
▪️ दिल्ली – 51,140 रुपये
▪️ कोलकत्ता – 50,980 रुपये
▪️ बंगळुरू – 51,030 रुपये
▪️ हैदराबाद – 51,980 रुपये
▪️ पुणे – 51,010 रुपये
▪️ लखनऊ – 51,140 रुपये
▪️ नागपूर -51,010 रुपये
▪️ नाशिक – 51,010 रुपये

Advertisement

(वर दिलेल्या देशातील मोठ्या शहरांतील दर आणि तुमच्या शहरांतील दरांमध्ये किंचित फरक असू शकतो. तुमच्या शहरातील अचूक दर जाणून घेण्यासाठी ज्वेलर्सकडे जाऊन चौकशी केल्यानंतर खात्री करूनच खरेदी करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement