SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. दांपत्य जीवन सुखकारक राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावरही होणार आहे. बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. आरोग्याबाबत निष्काळजी राहणे योग्य नाही.

वृषभ (Taurus): गैरसमजाला मनात थारा देऊ नका. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा. मित्रांशी मतभेदाची शक्यता. आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

Advertisement

मिथुन (Gemini) : मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून वाट पाहात असलेली कीर्ती मिळेल.

कर्क (Cancer) : मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. वडिलांशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. आरोग्याच्या किरकोळ समस्या असू शकतात.

Advertisement

सिंह (Leo) : नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका. चर्चेतून मार्ग काढावा. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे. कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका. आज अचानक व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. अधिकार्‍यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमची दिनचर्या पाळून तुम्ही निरोगी राहू शकता.

कन्या (Virgo) : मानसिक ताण जाणवेल. अतिविचार करू नका. आवडते पदार्थ चाखाल. स्वत:ला नियमांमध्ये बांधून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील. आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील. योग्य नातेसंबंध आल्याने विवाहयोग्य लोकांसाठी आनंदाचे वातावरण राहील.

Advertisement

तुळ (Libra) : भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. मुलांचे विचार स्व‍च्छंदी वाटतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदाराचे विचार जाणून घ्याल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

वृश्‍चिक (Scorpio) : भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका. शिस्तीचा फार बडगा करू नका. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

Advertisement

धनु (Sagittarius) : भावनिक अस्थिरता जाणवेल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

मकर (Capricorn) : चांगल्या संधीच्या शोधत रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

Advertisement

कुंभ (Aquarious) : शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. सावधानतेने पावले उचलावीत. बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी. आज पैशांची भरभराट होईल. तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

मीन (Pisces) : महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. वरिष्ठांची भेट घेता येईल. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा. आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

Advertisement